Shreya Maskar
आपण नेहमी सुंदर त्वचेसाठी चेहऱ्याला फेस पॅक लावतो. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि कोमल होते. मात्र कधी कधी फेस पॅक लावलेला चेहरा धुतल्यावर त्वचा कोरडी, ताणलेली आणि निर्जीव वाटते. अशावेळी मऊ त्वचेसाठी फेस पॅकमध्ये खालील दिलेल्या पदार्थांपैकी कोणताही एक मिसळा.
एलोवेरामधील जीवनसत्त्वे आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेला खोलवर पोषण देतात. त्यामुळे तुमच्या फेस पॅकमध्ये १-२ चमचे ताजे एलोवेरा जेल मिक्स करा.
एलोवेरा कोरडेपणा दूर करते आणि मऊ, हायड्रेटेड त्वचा ठेवते. ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होतात. त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून राहते. तसेच चेहरा फुलतो.
मधात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेला मॉइश्चरायझ करतात आणि संसर्गापासून दूर ठेवतात. मधामुळे त्वचा कोरडी राहत नाही.
दूध आणि दही दोन्हीमध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेला हळूवारपणे एक्सफोलिएट करते. ज्यामुळे त्वचा मऊ राहते. यामुळे यातील एक पदार्थ नक्की फेस पॅकमध्ये टाका.
फेस पॅकमध्ये १-२ चमचे दूध किंवा दही घाला. दही त्वचेला थंडावा देते. विशेषता उन्हाळ्यात याचा वापर करा.
फेस पॅक लावताना त्यातील घटक तुमच्या त्वचेचा प्रकाराला आणि स्किन टोनला सूट होतील का? याची खात्री करा आणि मगच फेस पॅकमध्ये मिक्स करा. जेणेकरून फेस पॅक लावल्यावर त्वचा कोरडी दिसणार नाही.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.