team india  saam tv
Sports

Praveen Kumar Accident: टीम इंडियाच्या स्टार खेळाडूच्या कारला अपघात! थोडक्यात बचावले प्राण

Praveen Kumar: भारतीय संघातील दिग्गज खेळाडूच्या कारचा अपघात झाला आहे

Ankush Dhavre

Praveen Kumar Car Accident: क्रिकेट विश्वातून एक मोठी माहिती समोर येत आहे. भारतीय संघातील दिग्गज खेळाडूच्या कारचा अपघात झाला आहे. या मोठ्या अपघातातून दिग्गज क्रिकेटपटू थोडक्यात बचावला आहे.

माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या प्रवीण कुमारच्या कारचा (Praveen Kumar) अपघात झाला आहे. त्याला कारला ट्रकने धडक दिली आहे. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी प्रवीण कुमार आणि त्याचा मुलगा कारच्या आत होता. या अपघातानंतर स्थानिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

आपल्या स्विंग गोलंदाजीमुळे ओळखला जाणाऱ्या प्रवीण कुमारने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ६ कसोटी सामन्यांमध्ये २७, ६८ वनडे सामन्यांमध्ये ७७ आणि १० टी -२० सामन्यांमध्ये ८ गडी बाद केले आहेत. वयाच्या २६ व्या वर्षी तो संघाबाहेर झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण कुमार आणि त्याच्या मुलाची प्रकृती स्थिर आहे. मंगळवारी रात्री १० वाजता हा अपघात झाला आहे. मुलतान नगर येथे राहणारा प्रवीण कुमार आपल्या कारमधून पांडव नगरच्या दिशेने जात होता. त्यावेळी वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. (Latest sports updates)

ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी, प्रवीण कुमार आणि त्याचा मुलगा कारच्या आत होते. या अपघातानंतर ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघात होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाला ताब्यात घेतलं आहे.

तसेच डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही सुरक्षित आहेत. प्रवीण कुमार २०१२ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती घेतलं धनुष्यबाण

Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

Congress Leader: एक्झिट पोलनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का, निवडणूक संपताच बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Akola Crime:धक्कादायक! विद्यार्थिनीवर मास्तराची वाईट नजर; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

SCROLL FOR NEXT