hardik pandya twitter
Sports

IND vs ENG: असं कोण खेळतं? हार्दिकच्या फ्लॉप शोनंतर दिग्गज खेळाडू भडकला, गंभीरलाही झापलं

Parthiv Patel On Hardik Pandya: भारतीय संघाच्या फ्लॉप शो नंतर पार्थिव पटेलने हार्दिक पंड्याच्या फलंदाजीवरुन जोरदार टीका केली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला २६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकअखेर ९ गडी बाद १७१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाला २० षटकअखेर ९ गडी बाद १४६ धावा करता आल्या.

या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्ती चमकला. पण फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना सूर गवसला नाही. या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने हार्दिक पंड्याला टार्गेट केलं. यासह गंभीरबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे.

हार्दिक पंड्यावर जोरदार टीका

राजकोटच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या अभिषेक शर्माने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती .त्यानंतर ९ व्या षटकापासून ते १६ व्या षटकापर्यंत भारतीय फलंदाजांना अवघ्या ४० धावा जोडता आल्या. हे भारतीय संघाच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं.

हार्दिक पंड्या हा वर्तमान टी-२० संघातील सर्वात अनुभवी फलंदाज आहे. मात्र त्यालाही नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. धावांचा पाठलाग करताना हार्दिकने ३५ चेंडूंचा सामना केला.यादरम्यान त्याने केवळ १ चौकार आणि २ षटकार खेचून ४० धावा जोडल्या. त्याची ही कामगिरी पाहून पार्थिव पटेलने त्याच्यावर जोरदार टीका केली.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, ' टी-२० क्रिकेटमध्ये कुठलाच फलंदाज सेट होण्यासाठी २० ते २५ चेंडू घेत नाही. मला माहितीये तुम्हाला सेट होण्यासाठी वेळ लागतो. पण तेव्हा तुम्ही स्ट्राईक रोटेट करत राहायला हवं. त्याने जरी ३५ चेंडूत ४० धावा केल्या असतील, पण सुरुवातीला त्याने काही चेंडू निर्धाव खेळून काढले.'

तसेच इंग्लंडचा माजी फलंदाज म्हणाला, ' भारतीय संघाचा फलंदाजीक्रम चूकीचा होता. ध्रुव जुरेल अनुभवी फलंदाज आहे. त्याला लेफ्टी - रायटी कॉम्बिनेशनमध्ये ठेवणं चूकीचं होतं. मला तरी हेच वाटतं की, सर्वश्रेष्ठ फलंदाजाने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावं.' या डावात ध्रुव जुरेलला ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली गेली होती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT