rohit sharma with virat kohli yandex
क्रीडा

Harbhajan Singh Prediction: हरभजन सिंगची मोठी भविष्यवाणी! रोहित- विराटच्या निवृत्तीची तारीख सांगितली

Harbhajan Singh On Virat Kohli-Rohit Sharma Retirement: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने विराट कोहली आणि रोहित शर्मा निवृत्ती केव्हा जाहीर करणार याबाबत भाष्य केलं आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने शानदार कामगिरी करत वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आता भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे.

विराट-रोहितने केव्हा निवृत्ती घ्यायला हवी?

पीटीआयसोबत बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, ' रोहित शर्मा आणखी २ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतात. विराटची फिटनेस पाहता तो आणखी ५ वर्ष भारतीय संघासाठी खेळू शकतो. तो भारतीय संघातील सर्वात फिट क्रिकेटपटू आहे.'

तसेच तो पुढे म्हणाला की.' तुम्ही विराटसोबत खेळणाऱ्या १९ वर्षीय खेळाडूला विचारा, विराट इतका फिट आहे की,तो त्यालाही मागे सोडेल. मला खात्री आहे, विराट आणि रोहितमध्ये बरंच क्रिकेट अजूनही शिल्लक आहे. हे सर्वत्र त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. जर तो फिट आहे, चांगली कामगिरी करतोय आणि संघ जिंकतोय तर त्यांनी खेळणं सुरु ठेवायला हवं.'

कसोटी क्रिकेटमध्ये या खेळाडूंची गरज

'रेड बॉल क्रिकेटमध्ये या दोन्ही खेळाडूंची खूप गरज आहे. कसोटी असो की मर्यादीत षटकांचं क्रिकेट, खेळाडूला तिन्ही फॉरमॅट खेळण्याचा अनुभव असायला हवा. जर एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल, तर निवडकर्त्यांनी त्याला संघाबाहेर करावं. मग तो ज्युनिअर असो की सिनियर. मात्र एखादा खेळाडू फिट असेल, तर त्याला संधी मिळायला हवी. ' असं हरभजन सिंग म्हणाला.

टी-२० क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने मोलाची भूमिका बजावली होती. रोहितने संपूर्ण स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. तर विराट कोहलीन फायनलमध्ये महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्येवर पोहोचवलं होतं. दरम्यान फायनल जिंकताच आधी विराट कोहली, मग रोहित शर्मा आणि फायनलच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT