gautam gambhir on ms dhoni  saam tv
क्रीडा

Gautam Gambhir Statement: एका सिक्समुळे धोनीचं कौतुक का? वर्ल्डकपबाबत बोलताना गंभीर भडकला

Ankush Dhavre

Gautam Gambhir On MS Dhoni's Last Ball Six:

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. तर भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

या स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी दिग्गज खेळाडू या स्पर्धेबाबत भाष्य करताना दिसून येत आहेत. नुकताच माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने २०११ वर्ल्डकप स्पर्धेतील किस्सा सांगत एमएस धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय संघाने २०११ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. त्यावेळी एमएस धोनी हा भारतीय संघाचा कर्णधार होता. या सामन्यात धोनीने शेवटी षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

याबाबत बोलताना गौतम गंभीरने रेवस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' आपण युवराजला २०११ वर्ल्डकपसाठी हवं तितकं श्रेय दिलं नाही. इतकेच नव्हे तर जहीर, रैना, मुनाफ आणि सचिनने तर सर्वाधिक धावा केल्या होत्या. पण आपण कोणाबद्दल बोलतो? माध्यमांमध्ये धोनीच्या षटकाराची चर्चा सुरू असते. तुम्ही केवळ खेळाडूला पसंती देतात. तुम्ही संघाला विसरताय.' (Latest sports updates)

भारतीय संघाने २०११ मध्ये शेवटचा वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर २०१५ आणि २०१९ वनडे वर्ल्डकप भारतीय संघाला सेमीफायनलमधून बाहेर पडावं लागलं होतं. यावर्षी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा भारतात होणार आहे.

त्यामुळे भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध चेन्नईच्या मैदानावर रंगणार आहे.

तर भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना १४ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT