Siddhi Hande
काहीतरी चटपटीत खायचं मन झालं असेल तर तुम्ही स्प्रिंग रोल ट्राय करु शकतात.
पनीर स्प्रिंग रोल हे खूप टेस्टी आणि पौष्टिक असतात. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील.
किसलेले पनीर, कांदा, शिमला मिरची, कोबी, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाला, धने-जिरे पावडर,मीठ कोथिंबीर
रोल बनवण्यासाठी स्प्रिंग रोल शीट, मैदा आणि पाणी आवश्यक आहे.
सर्वात आधी तुम्हाला सारण बनवायचे आहे. त्यासाठी एका भांड्यात किसलेले पनीर, कांदा, शिमला मिरची, कोबी, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, सर्व मसाले टाकून एकजीव करुन घ्या.
हे सर्व सारण व्यवस्थित मिक्स करा. त्यावर कोथिंबीर टाका.
यानंतर रोल बनवण्यासाठी स्प्रिंग रोल शीट घ्या. यात सारण भरा. यानंतर रोल करा.
यानंतर कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पेस्ट करा. ती या रोलच्या कडांना लावून सील करा.
यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात हे स्प्रिंग रोल टाकून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
हे कुरकुरीत स्प्रिंग रोल तुम्ही सॉससोबत खाऊ शकतात. हे खूप चवदार असतात.