Matki Bhaji Recipe: सकाळी डब्ब्यासाठी बनवा मटकीची भाजी, ही आहे सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

मटकीची भाजी

मटकीची भाजी खायला अत्यंत चविष्ट लागते. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच मटकीची भाजी खायला आवडते.

Matki Bhaji | Social Media

बनवण्याची पद्धत सोपी

सकाळी डब्ब्यासाठी तुम्ही घरीच अत्यंत सोप्या पद्धतीने मटकीची भाजी बनवू शकता. मटकीची भाजी बनवण्यासाठी नेमकी प्रोसेस आणि साहित्य काय लागते हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Matki Bhaji | Social Media

साहित्य

मटकीची भाजी बनवण्यासाठी मोड आलेली मटकी, मसाला, हळद, कांदा, टोमॅटो, मीठ, कोथिंबीर, लसूण हे साहित्य घ्या.

Matki | yandex

मोड आलेली मटकी घ्या

मटकीची भाजी बनवण्यासाठी मोड आलेली मटकी घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरे याची फोडणी द्या.

Matki Bhaji | yandex

कांदा चांगला परतून घ्या

मिश्रणात बारीक चिरलेला कांदा मिक्स करा. कांदा साधारण गुलाबी रंग होईपर्यत चांगला परतून घ्या.

Onion Chopping | GOOGLE

टोमॅटो शिजवून घ्या

नंतर या मिश्रणात आले- लसूण पेस्ट मिक्स करा आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.

tomato

मसाले मिक्स करा

संपूर्ण मिश्रण मध्यम आचेवर शिजल्यानंतर यात हळद, लाल मसाला, गरम मसाला घाला. मसाला करपणार नाही याची काळजी घ्या.

spices

मटकी मिक्स करा

 आता स्वच्छ धुवून घेतलेली मटकी तयार मसाल्यात टाका आणि २-३ मिनिटे चांगली परतून घ्या. नंतर या मिश्रणात गरम पाणी टाका आणि भाजी शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवा.

Matki Bhaji | yandex

मटकीची भाजी तयार

मटकीच्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. अशाप्रकारे मटकीची चविष्ट भाजी तयार होईल.

Matki Bhaji | Social Media

next: Mustard Oil For Skin: त्वचेला लावा मोहरीचे तेल, फक्त १० दिवसांत दिसेल मोठा फरक

|
येथे क्लिक करा...