
सोलापुरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे.सोलापूर शहरातील राजमुद्रा रेसिडन्सी येथे माजी नगरसेवक गणेश वानकर यांचे वडील प्रकाश वानकर यांच्या घरात 27 डिसेंबर रोजी चोरी करण्यात आली होती.घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने सुमारे 15 लाख रोख रक्कम चोरली होती.तर सिसिटिव्हीचा डिव्हीआर समजून वायफाय राउटर देखील चोराने नेला होता.या प्रकरणाचा तपास करत सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मोईन दूधेकुला याला तेलंगणा मधून अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून रोख 13 लाख,वायफाय राउटर,गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
नगरपरिषद निवडणुकीनंतर बुलढाण्यात भाजपात अंतर्गत गटातटाच्या राजकारणाचा वाद उफाळून आला आहे. भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष उदय देशपांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यांचं सत्र सुरू ठेवल आहे. जवळपास दहा ते पंधरा बड्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, तर नगरपरिषद निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याने या सर्वांवर चौकशी अंति कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे व कारवाईच्या भीतीने व कुठल्यातरी आमिषाला बळी पडल्याने या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं भाजपाचे बुलढाणा शहर अध्यक्ष मंदार बाहेकर यांनी म्हटलं आहे. भाजपात राजीनामा सत्र सुरू झाल्याने बुलढाण्यात मात्र राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पक्षाने तीन उमेदवारांना आधी उमेदवारी दिली एबी फॉर्म दिले मात्र शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी ने वळण घेत या तीनही उमेदवारांना चुकून एबी फॉर्म दिल्याचे पत्र भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे. या तीनही उमेदवारांच्या जागी युवा स्वाभिमान पक्षाला पाठिंबा दिल्याचे पत्र शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी काढले आहे.
उमेदवारांनी माघार केव्हा घेतली त्यांनी दबावाचा काही आरोप केला का याची शहानिशा करून सविस्तर अहवाल
निवडणूक आयोगाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविला अहवाल
हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कृषी पाणीपुरवठा व रोजगार हमी योजनेमध्ये काम केलेल्या कंत्राटदार व शेतकऱ्यांचे 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची देयके प्रलंबित असल्याने बाजारपेठेसह विकास कामे देखील ठप्प पडली आहेत, शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहीर गोठा पांदण रस्ते यासारखी कामे केली आहेत तर कृषी विभाग व पाणीपुरवठा विभागाची मोठ्या योजनांची कामे कंत्राटदारांनी केली आहेत दरम्यान स्वतः जवळ असलेला पैसा गुंतवलेल्या या शेतकरी कंत्राटदारांना शासनाच्या तिजोरीमध्ये निधी उपलब्ध नसल्याने देयके मिळण्यास उशीर होत आहे परिणामी याचा गंभीर परिणाम बाजारपेठेतील व्यापारावर देखील झाला आहे.
MIM च्या एका अधिकृत उमेदवाराने घेतला उमेदवारी अर्ज मागे
प्रभाग 14 (अ) मधून परवीण कैसर खान या महिला उमेदवारांनी घेतला अर्ज मागे
काँग्रेसचे उमेदवाराला मदत व्हावी म्हणून घेतली माघार
आता प्रभाग क्रमांक 14 (अ)मध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी मैदानात
प्रभाग क्रमांक 14 मध्ये एमआयएमने दोनच उमेदवार केले होते उभे, त्यातील एकाची माघार
उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून आता अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुकीसाठी एकूण 621 उमेदवारांचे वैधरित्या नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात आले होते. मात्र उमेदवारी माघार घेण्याच्या कालावधीत 189 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अखेर 432 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.उल्हासनगर महापालिकेच्या एकूण 78 जागांसाठी हे 432 उमेदवार मतदारांसमोर आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार असून अनेक प्रभागांत तिरंगी तर काही प्रभागांत चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.निवडणूक रिंगणात शिवसेना शिंदे गटाने स्थानिक पक्ष टी.ओ.के. आणि साई पक्षासोबत युती केली आहे. तर भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे.आगामी मतदानात मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात आणि सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जातात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
राज्यात भाजपाचं तिकीट वाटप चांगलंचं चर्चेत राहिलंय. तिकीट वाटपावरून झालेला मोठा गोंधळ, रडारड आणि त्यावरून झालेला राडा राज्यात चर्चेचा विषय झालाय. अनेक ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातून आलेले उपरे आणि मोठ्या नेत्यांच्या कुटूंबात दिलेल्या तिकिटावरूनही भाजपवर मोठी टीका झाली. मात्र, अकोल्यात भाजपाने दिलेल्या एका तिकिटाची जोरदार चर्चा शहरात होतेय. अकोल्यात भाजपने प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर 'मंगेश झिने' या अत्यंत सर्वसामान्य घरातील गरीब तरुणाला उमेदवारी दिलीये.
पी एम पी एल बस मधे रिल तयार करणे भोवलं
पूर्वपरवानगी न घेता पीएमपीच्या बस मध्ये रिल काढून प्रसारित केल्याप्रकरणी नोटीस
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली कारवाई
जिल्हा परिषद कार्यालयासमोर सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचून कारवाई
रामकिसन गंगाधर घ्यार (वय ४३) आरोग्य सेवक, जिल्हा परिषद पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव
बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदार (वय ४१) हेही आरोग्य सेवक असून, जून महिन्यात त्यांची उपसंचालक कार्यालय कोल्हापूर मंडळ येथून उपसंचालक कार्यालय पुणे मंडळ येथे अंतरमंडळ बदली झाली होती. मात्र, पुणे मंडळात त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नव्हती
प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रिक्त असलेल्या आरोग्य सेवक पदावर नेमणूक मिळावी, यासाठी त्यांनी विनंती अर्ज केला होता. या अनुषंगाने आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची भेट घेतली असता, त्यांनी आरोपी रामकिसन घ्यार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने तक्रारदारास मागितलेल्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी डॉ. पवार यांच्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे
याबाबत तक्रारदाराने पुणे एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता, आरोपीने बदलीच्या कामासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले
कोरेगाव भीमा परिसरात विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास आलेल्या नागरिकांच्या गर्दीचा चोरट्यांनी घेतला गैरफायदा
चोरट्यांनी एका महिलेसह दोघा तरुणांचे सोन्याचे दागिने नेले चोरून
याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील इंदिरानगरमध्ये राहणारा ३१ वर्षीय तरुण मित्रांसमवेत विजयस्तंभ अभिवादनासाठी आला होता. सोहळ्यादरम्यान गर्दीत चोरट्यांनी त्याचे सुमारे ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. २७ वर्षीय तरुणाचे सुमारे २८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले अन्य एका घटनेत आंबेगाव पठार येथील त्रिमूर्ती चौक परिसरातील ३० वर्षीय तरुणी विजयस्तंभ अभिवादनासाठी आली होती. तिचे सुमारे २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू
नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर वाढलेल्या वर्दळीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून एक जानेवारीच्या पहाटेपर्यंत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या २०८ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेने ३१ डिसेंबर रोजी रात्री शहरातील विविध भागांत ४० ठिकाणी नाकाबंदी पॉइंट उभारण्यात आले होते. या कालावधीत दोन हजार १२८ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्या २०८ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. याशिवाय, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. विविध कारवायांतून ७० हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
रायगडच्या कर्जत मधील उबाठा आणि अजित दादांच्या राष्ट्रवादी युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवार पुष्पा दगडे यांच्यासहित 13 नगरसेवक आणि नगरसेविकांनी पदग्रहण करत कामकाज सुरू केलं. अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी ठाकरे सेना, अजित दादांची राष्ट्रवादी आणि परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.