Mumbai Indians Tweet: चंद्रस्पर्श यशस्वी आता वर्ल्डकपही आपलाच; चांद्रयान 3 च्या यशाशी विश्वचषकाचे खास कनेक्शन...

Mumbai Indians Tweet On Chandrayaan 3: चांद्रयान ३ मिशन यशस्वी झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने एक ट्विट केले आहे.
team india
team indiasaam tv
Published On

Mumbai Indians Tweet On ODI World Cup 2023:

भारताने बुधवारी इतिहास रचला आहे. जे कोणालाच नाही जमलं ते भारताने करून दाखवलं आहे. १४ जुलै रोजी भारताचं चांद्रयान ३ हे यान अवकाशाच्या दिशेने झेपावलं होतं. अखेर २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान ३ ने चंद्रावर पाऊल ठेवले.

यासह भारत हा भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश ठरला आहे. हा ऐतिहासिक क्षण कोट्यावधी भारतीयांनी लाइव्ह पाहिला. दरम्यान इतिहास घडल्यानंतर इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

team india
IND VS IRE 3rd T2OI: 'हे खूप निराशाजनक होतं..' मालिका जिंकूनही कॅप्टन बुमराह या कारणामुळे नाराज

भारताच्या चांद्रयान ३ ने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवताच मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. मुंबई इंडियन्सने या मिशनची तुलना २०१९ वर्ल्डकप स्पर्धेसोबत केली आहे. २०१९ मध्ये भारताचं चांद्रयान २ मिशन अयशस्वी ठरलं होतं.

याच वर्षी भारतीय संघाला वर्ल्डकप स्पर्धेत देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. आता चांद्रयान ३ मिशन यशस्वी ठरला आहे आणि यावर्षी वर्ल्डकप देखील आहे.

भारतीय संघाला २०१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर याच वर्षी भारताने चंद्रावर रोवर पाठवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यामुळे मुंबई इंडीयन्सचं असं म्हणणं आहे की, जर भारताला यश मिळालं आहे तर भारतीय संघाला देखील नक्कीच यश मिळेल. (Latest sports updates)

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. मात्र सेमीफायनलचा सामना भारतीय संघाने गमावला होता. यावर्षी भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला आशिया चषक २०२३ स्पर्धा खेळायची आहे. या स्पर्धेत केएल राहुल, श्रेयस अय्यरसारखे प्रमुख फलंदाज कमबॅक करताना दिसून येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com