भारताचा माजी क्रिकेटपटू आता केनिया संघाला प्रशिक्षण देताना दिसून येणार आहे. १९९६-९७ मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारे मध्यमगती वेगवान गोलंदाज डोडा गणेश यांची केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या कारकीर्दीचाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांना झिम्बाब्वेविरुद्ध एकमात्र वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांनी ५ षटकात २० धावा खर्च केल्या. यासह ४ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ५ गडी बाद केले.
डोडा गणेश यांना आपल्या कारकिर्दीत चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र ते आपल्या गोलंदाजी स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असायचे. त्यांची गोलंदाजी स्टाईल ही भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्याशी मिळती जुळती होती.
त्यानंतर त्यांनी आपली गोलंदाजी अॅक्शन बदलली. एकदा संघाबाहेर झाल्यानंतर त्यांना संघात कमबॅख करता आलं नव्हतं. त्यांनी १९९८-१९९९ मध्ये कर्नाटक संघासाठी शानदार कामगिरी केली होती. ज्यावेळी डोडा गणेश भारतीय संघासाठी खेळायचे त्यावेळी वेंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथसारखे खेळाडू राष्ट्रीय संघासाठी खेळायचे.
आता ते केनिया संघाला प्रशिक्षण देताना दिसून येणार आहे. त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. केनिया संघाला आतंरराष्ट्रीय पातळीवर हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्यांच्याकडून चांगली कामगिरी करावी
डोडा गणेश यांनी आपल्या कारकिर्दीत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १०४ आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये ८९ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांनी ३६५ आणि १२८ गडी बाद केले आहेत. यासह त्यांनी फलंदाजी करताना २०२३ आणि ५२५ धावा केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.