dinesh karthik yandex
Sports

Dinesh Karthik Apologies: 'भावांनो, खूप मोठी चूक झाली..',दिनेश कार्तिकला लाईव्ह VIDEO मध्ये मागावी लागली माफी

Dinesh Karthik On MS Dhoni: भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला लाईव्ह व्हिडिओवर माफी लागली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिनेश कार्तिकने काही दिवसांपूर्वी भारताची ऑल टाईम ग्रेट प्लेइंग ११ ची निवड केली होती. ही प्लेइंग ११ निवडताना त्याने एक चूक केली होती. त्याने आपल्या प्लेइंग ११ मध्ये एमएस धोनीचा समावेश केला नव्हता. दरम्यान कार्तिकने आता आपली चूक मान्य केली आहे.

एमएस धोनीला आपल्या प्लेइंग ११ मध्ये स्थान न दिल्याने दिनेश कार्तिकवर जोरदार टीका केली होती. दरम्यान आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात दिनेश कार्तिक माफी मागताना दिसून येतोय.

दिनेश कार्तिक म्हणाला की, 'भावांनो, खूप मोठी चूक झाली. खरंच ही खूप मोठी चूक होती. मला तेव्हा जाणवलं, जेव्हा या गोष्टी माझ्या समोर आल्या. तुम्हाला विश्वास बसेल का? एक यष्टीरक्षक असून मी यष्टीरक्षकाला संघात स्थान द्यायला विसरलो. ही खूप मोठी चूक आहे.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'धोनी आतापर्यंत खेळलेल्या खेळाडूंमधून दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. मला जर त्या संघात १ बदल करण्याची संधी मिळाली, तर तो धोनी असेल. मी त्याची सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी निवड करेल. तो कुठल्याही भारतीय संघाचा कर्णधार असेल.'

या दिग्गज खेळाडूंनाही वगळलं

काही दिवसांपूर्वी दिनेश कार्तिकने भारताच्या ऑल टाईम ग्रेट प्लेइंग ११ ची निवड केली होती. या संघात त्याने विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंना स्थान दिलं होतं.

मात्र तो धोनीला स्थान द्यायला विसरला होता. यासह या भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे कपिल देव, त्यानंतर सौरव गांगुली आणि वर्ल्डकपच्या २ फायनलमध्ये निर्णायक खेळी करणाऱ्या गौतम गंभीरलाही या संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

अशी आहे दिनेश कार्तिकने निवडलेली ऑल टाईम ग्रेट प्लेइंग ११:

विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह, जहीर खान.

१२ वा खेळाडू: हरभजन सिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक जोराचे वादळी वारे

Neck Cancer Symptoms : घसा अचानक दुखतोय? असू शकतो मानेच्या कॅन्सरचा धोका, वेळीच वाचा लक्षणं

Fort In Panvel : उंच कडे अन् कातळ पायऱ्या; पनवेलजवळ वसलाय 'हा' भव्य किल्ला, प्रत्येक पावलावर अनुभवाल थरार

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?

Crime News: खोलीत बोलवून जबरदस्तीने किस, नंतर प्राइव्हेट पार्टला...; बॉक्सिंग कोचचं अल्पवयीन तरुणीसोबत विकृत कृत्य

SCROLL FOR NEXT