Dinesh Karthik: विक्रांत मैसी की दिनेश कार्तिक? चित्रपट पाहिल्यानंतर चाहते गोंधळात,ट्वीट व्हायरल

Dinesh Karthik Vikrant Massey: फिर आई हसीन दिलरुबा या चित्रपटाचा प्रीमियर होताच, भारताचा स्टार खेळाडू दिनेश कार्तिक आणि विक्रांत मैसी यांच्यामुळे फॅन्स गोंधळात आल्याचे पाहायला मिळाले आहे.
Dinesh Karthik: विक्रांत मैसी की दिनेश कार्तिक? चित्रपट पाहिल्यानंतर चाहते गोंधळात,ट्वीट व्हायरल
dinesh karthik twitter
Published On

Phir Aayi Hasseen Dillruba: नेटफ्लिक्सवर येत्या काही दिवसांत भन्नाट चित्रपट लॉन्च होणार आहेत. त्यापैकीच एका चित्रपटाचा प्रीमियर ९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातच तापसी पन्नू, सनी कौशल आणि विक्रांत मैसीसारखे (Vikrant Messey) स्टार कलाकार झळकणार आहेत. मात्र या चित्रपटाच्या प्रीमियरनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Dinesh Karthik: विक्रांत मैसी की दिनेश कार्तिक? चित्रपट पाहिल्यानंतर चाहते गोंधळात,ट्वीट व्हायरल
Dinesh Karthik Retirement: १६ वर्ष, ६ संघ आणि एक पुरस्कार; दिनेश कार्तिकची IPLमधून निवृत्ती

फिर आई हसीन दिलरुबा या चित्रपटाचा प्रीमियर समोर येताच 12th Fail चित्रपटाचा अभिनेता विक्रांत मैसी सध्या तुफान चर्चेत आहे. तर झाले असे की, एका फॅनने दिनेश कार्तिकला विक्रांत मैसी समजून चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही प्रतिक्रिया येताच दिनेश कार्तिकने देखील या ट्वीटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Dinesh Karthik: विक्रांत मैसी की दिनेश कार्तिक? चित्रपट पाहिल्यानंतर चाहते गोंधळात,ट्वीट व्हायरल
Dinesh Karthik: धोनी, रोहित नंतर दिनेश कार्तिकचा अनोखा विक्रम

दिनेश कार्तिकची मजेशीर प्रतिक्रिया

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतो. एखाद्या फॅनने काही पोस्ट केली, की त्यावर त्याचा रिप्लायही येत असतो. नुकताच एका फॅनेने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली. ज्यावर त्याने,' आताच फिर आई हसीन दिलरुबा पाहिला' दिनेश कार्तिकने काय दमदार कामगिरी केलीये.' या ट्वीट शेअर करत दिनेश कार्तिकने लिहिले की, 'अरे वाह! धन्यवाद..' यासह त्याने हसण्याची इमोजी देखील शेअर केली आहे.

आयपीएल स्पर्धेला केला रामराम

दिनेश कार्तिक भारतीय संघातील प्रमुख यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक आहे. एमएस धोनी संघात असताना त्याला फारशी संधी मिळाली नव्हती. मात्र त्यानंतर त्याने फिनिशर म्हणून आपलं स्थान मिळवलं.

आयपीएलमध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व करताना शानदार कामगिरी केली होती. या संघाच्या विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. दरम्यान आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर त्याने आयपीएल स्पर्धेला रामराम करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com