kl rahul  saam tv
क्रीडा

Asia Cup 2023: 'केएल राहुलला बाहेर करा.. ', माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ..

Ankush Dhavre

Sanjay Bangar On KL Rahul:

आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ३० ऑगस्टपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरीदेखील हायब्रिड मॉडेल असल्याने सामन्यांचे आयोजन श्रीलंका आणि पाकिस्तानात केले जाणार आहे.

आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यरसारखे फलंदाज कमबॅक करताना दिसून येणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संजय बांगर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

संजय बांगर यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' मला असं वाटतं की तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात फिट बसतो. भारतीय संघाच्या टॉप ५ मध्ये एकही गोलंदाज नाही. त्यामुळे तुम्हाला जर ६ गोलंदाज हवे असतील तर तुम्हाला टॉप ५ मध्ये केएल राहुलचा समावेश करावा लागेल. जर तो यष्टिरक्षण करणार असेल तर त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे संघात संतुलन टिकून राहील.'

ईशान किशनबद्दल बोलताना काय म्हणाले संजय बांगड..

ईशान किशनबद्दल बोलताना संजय बांगर म्हणाले की, ' जर केएल राहुल फलंदाज म्हणून फिट बसत नसेल तर ईशान किशन परफेक्ट चॉईस असू शकतो. तो एक उत्कृष्ठ यष्टिरक्षक आहे आणि तो जबाबदारीने खेळतो. आता भारतीय संघ ५० षटकांचे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे संघात फिट यष्टिरक्षक फलंदाज असणं गरजेचं आहे. तुम्ही अशा खेळाडूला मुळीच खेळवू शकत नाही जो पूर्णपणे फिट नाही किंवा पुन्हा दुखापतग्रस्त होऊ शकतो.' (Latest sports updates)

आशिया चषकासाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT