team india saam tv news
Sports

IND vs ENG 1st Test: इंग्लंडला हलक्यात घेऊ नका..' कसोटी मालिकेपूर्वीच दिग्गज खेळाडूची टीम इंडियाला वॉर्निंग

Monty Panesar On IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी इंग्लंडचा माजी खेळाडू माँटी पानेसर याने भारतीय संघाला वॉर्निंग दिली आहे.

Ankush Dhavre

Monty Panesar On Team India:

हैदराबादच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना रंगणार आहे. भारतीय संघ इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

तर दुसरीकडे इंग्लंडचे फलंदाज बॅजबॉलने भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. बॅझबॉल की फिरकी गोलंदाज? भारत इंग्लंड कसोटी मालिकेत कोण कोणाला मागे सोडत श्रेष्ठ ठरणार? या मुद्द्यावरुन अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

भारतीय गोलंदाजांविरुद्ध खेळताना बॅझबॉलची जादू चालणार का? असा प्रश्न विचारला असता इंग्लंडच्या माजी खेळाडूने सरळ नाही असं उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत बोलताना माँटी पानेसर म्हणाला की,'इंग्लंडचे फलंदाज भारतात फलंदाजी करताना डिफेंसिव क्रिकेट खेळताना दिसून येतील. ते स्विप आणि रिव्हर्स स्विप खेळताना दिसून येतील. ते भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध फ्रंट फुट डिफेन्स करताना अडचणीत येऊ शकतात.'

तसेच तो भारतीय संघाला वॉर्निंग देत म्हणाला की, ' फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या खेळपट्टीवर आमचे गोलंदाज सुपरहिट ठरणार आणि इंग्लंडला सहज हरवू असा विचार मुळीच करु नका. ते १५० वर ऑलआऊट होतील किंवा ५० षटकांमध्ये २५० धावा करतील. इंग्लंडचा संघ आक्रमक क्रिकेट खेळणार आहे. बेन स्टोक्स आपल्या फिरकी गोलंदाजांना सांगेल की, मला ४० षटकात १०० धावा खर्च करुन ५ विकेट्स नको आहे. मला १६ षटकात १०० धावा खर्च करुन ५ विकेट्स हवे आहेत. या मालिकेत इंग्लंडचा प्लान हाच असणार आहे.' (Cricket news in marathi)

तसेच तो पुढे म्हणाला की, ' भारतीय संघ जर इंग्लंडला हलक्यात घेत असेल तर ही भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहे. भारतीय संघाने मायदेशात खेळताना गेल्या १६ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. मात्र इंग्लंडच्या संघातही बदल झाले आहेत. इंग्लंडला केवळ आक्रमक क्रिकेट कसं खेळायचं हे चांगल्याने माहित आहे. बेन स्टोक्स भारतात कसोटी मालिका जिंकण्यासाठी आला आहे. जक त्याने असं करुन दाखवलं. तर तो दिग्गज कर्णधार बनू शकतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT