csk yandex
Sports

Dwayne Bravo Retirement: CSK च्या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला रामराम! पोस्ट शेअर करत केली निवृत्तीची घोषणा

Dwayne Bravo News In Marathi: वेस्टइंडीजचा स्टार खेळाडू ड्वेन ब्रावोने सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

वेस्टइंडीजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने निवृत्तीची घोषणा केली आहे. तो कॅरेबियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धा ही त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असणार आहे. ड्वेन ब्रावोने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल क्रिकेटला रामराम केला आहे.

आता तो कुठल्याही प्रकारचं प्रोफेशनल क्रिकेट खेळताना दिसून येणार नाहीये. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आपल्या निवृत्तीबाबत माहिती दिली आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत ड्वेन ब्रावो ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय.या संघासाठी खेळताना तो आपल्या टी-२० कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे.

ड्वेन ब्रावोने पोस्ट शेअर करत लिहिले की, ' हा प्रवास शानदार होता. हे हंगाम माझ्यासाठी शेवटचं हंगाम असणार आहे. कॅरेबियातील लोकांसमोर मी माझं शेवटचं हंगाम खेळण्यासाठी तयार आहे. TKR मधून माझं सर्वकाही सुरु झालं. आता शेवटही माझ्या संघासोबत होणार आहे.'

ड्वेन ब्रावो हा टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे. ड्वेन ब्रावोने १०३ सामन्यांमध्ये ८.६९ च्या शानदार इकोनॉमीने १२८ गडी बाद केले आहेत.

आयपीएलमधून घेतली निवृत्ती

ड्वेन ब्रावोने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. त्याने २०२१ मध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर २ वर्ष त्याने आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधित्व केलं. या संघाला ५ वेळेस चॅम्पियन बनवण्यात ड्वेन ब्रावोनेही मोलाची भूमिका बजावली आहे. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbh Rashi : आजचा दिवस पैशाच्या बाबतीत शुभ आहे,मात्र करिअर...; वाचा कुंभ राशीभविष्य

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

SCROLL FOR NEXT