csk yandex
Sports

Robin Uthappa: CSK चा माजी खेळाडू अडकला PF घोटाळ्यात; अरेस्ट वॉरंट निघालं, नेमकं प्रकरण काय?

Robin Uthappa PF Scam: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी खेळाडू पीएफ घोटाळ्यात अडकला आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाच्या अडचणीत वाढ झाली आहे. उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. ही बातमी बाहेर येताच, एकच खळबळ उडाली आहे. उथप्पा भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

PF घोटाळ्यात अडकला रॉबिन उथप्पा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या उथप्पावर PF घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी पीएफ वॉरंट जारी केला आहे. हे प्रकरण गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घालून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रॉबिन उथप्पा सेंच्युरीज लाईफस्टाईल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मॅनेजमेंटची कामं पाहत होता. आता त्याच्यावर पीएफबाबत मोठे आरोप करण्यात आले आहेत. त्याने कंपनीतील कर्मचारांच्या अकाऊंटमधून पीएफची रक्कम वजा केली, पण ती त्यांच्या पीएफ अकाऊंमध्ये अॅड केली नाही. माध्यमातील वृत्तानुसार, हा संपूर्ण घोटाळा २३ लाख रुपयांचा असल्याचं म्हटलं जात आहे.

आयुक्त गोपाल रेड्डी यांनी पुलकेशीनगर पोलिसांना पत्र लिहून या वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे रॉबिन उथप्पाने आपलं घर बदललं आहे. त्यामुळे हे पोलिसांनी हे वॉरंट पीएफ कार्यालयात परत पाठवलं आहे.

आता पुन्हा एकदा रॉबिन उथप्पाच्या घराचा पत्ता शोधायला सुरुवात केली आहे. हे पैसे कर्मचाऱ्यांचे आहेत. त्यामुळे पोलिसांनी पूर्ण जोर लावला आहे. सध्या पोलिस आणि पीएफ विभाग दोघेही उथप्पाच्या घराचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT