Australia Squad: IND vs AUS मालिकेतील शेवटच्या २ सामन्यांसाठी संघाची घोषणा! १९ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Australia Squad For IND vs AUS Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटच्या २ सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Australia Squad: IND vs AUS मालिकेतील शेवटच्या २ सामन्यांसाठी संघाची घोषणा! १९ वर्षीय खेळाडूला संघात स्थान
australiayandex
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने शानदार २९५ धावांनी विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

तर मालिका १-१ ने बरोबरीत असताना, तिसरा सामना ड्रॉ झाला. येत्या २६ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Australia Squad: IND vs AUS मालिकेतील शेवटच्या २ सामन्यांसाठी संघाची घोषणा! १९ वर्षीय खेळाडूला संघात स्थान
IND vs AUS: विराटची बॅट घेऊन आला अन् खणखणीत षटकार खेचला! Akash Deep च्या शॉटवर कोहलीची कडक Reaction- VIDEO

ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या या संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. उर्वरीत २ सामन्यांसाठी सलामीवीर फलंदाज नॅथन मॅकस्विनीला संघाबाहेर करण्यात आले आहे. तर वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन ३ वर्षांच्या कालावधीनंतर संघात परतणार आहे. यासह आणखी एका मोठा बदल म्हणजे, १९ वर्षीय सॅम कोनस्टासला या संघात स्थान देण्यात आलं आहे.

Australia Squad: IND vs AUS मालिकेतील शेवटच्या २ सामन्यांसाठी संघाची घोषणा! १९ वर्षीय खेळाडूला संघात स्थान
IND vs AUS: भारताचा पलटवार! पुन्हा एकदा 'गाबा'वर कब्जा; शेवटच्या २ सत्रात गेम फिरवला

भारतीय संघाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेसाठी १९ वर्षीय सॅन कोनस्टासला संधी देण्यात आली. या युवा फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्याने अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेतही दमदार खेळ केला होता.

त्यानंतर शेफिल्ड शिल्ड स्पर्धतील पहिल्याच सामन्यात त्याने १५२ आणि १०५ धावांची खेळी केली. त्यानंतर भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सामन्यात ७३ धावांची खेळी केली.

जर या १९ वर्षीय फलंदाजाला ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली, तर गेल्या ७० वर्षात तो ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरेल. यासह सीन अबॉट आणि ब्यू वेबस्टरला देखील या संघात स्थान देण्यात आलं आहे. तर वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड या मालिकेतून बाहेर पडला आहे.

Australia Squad: IND vs AUS मालिकेतील शेवटच्या २ सामन्यांसाठी संघाची घोषणा! १९ वर्षीय खेळाडूला संघात स्थान
IND vs AUS: गाबा कसोटी ड्रॉ झाली, तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? पाहा समीकरण

बॉर्डर- गावसकर मालिकेतील उर्वरीत २ सामन्यांसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), स्टीव स्मिथ (उपकर्णधार), सीन अबॉट, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोंस्टास, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, मिशेल मार्श, झाय रिचर्डसन, मिशेल स्टार्क, ब्यू वेबस्टर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com