rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Captaincy: 'मी त्याला कॅप्टन्सीवरुन काढलं असतं...', रोहितच्या नेतृत्वावर दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

Mark Waugh On Rohit Sharma Captaincy: रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही फ्लॉप ठरतोय. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क वॉ ने रोहितच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी शानदार विजय मिळवला होता. या सामन्यात जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा कर्णधार होता. त्यानंतर पुढच्या कसोटीत रोहित शर्मा परतला आणि त्याने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी घेतली.

या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. नेतृत्वासह रोहित शर्मा फलंदाजीतही फ्लॉप ठरला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क वॉने रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

कसोटी मालिकेत रोहितचा फ्लॉप शो

बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत रोहित शर्मा ४ वेळा फलंदाजीला आला आहे. यादरम्यान त्याने ३,६,१० आणि ३ धावा केल्या आहेत. मेलबर्न कसोटीतील पहिल्या डावात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. आता दुसऱ्या डावात तो कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

काय म्हणाले मार्क वॉ?

मेलबर्न कसोटीतील पहिल्या डावात रोहित अवघ्या ३ धावा करत माघारी परतला. फॉक्स क्रिकेटवर चर्चा करताना, मार्क वॉ म्हणाले,' जर मी निवडकर्ता असतो तर पुढची इनिंग डिसायडर ठरली असती.

जर त्याने दुसऱ्या डावात धावा केल्या नाहीत, तर मी त्याला स्पष्टच सांगितलं असतं की, आम्ही सिडनी कसोटीची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवतोय. त्याला स्पष्ट सांगितलं असतं की, हा त्याच्या कारकिर्दीचा शेवट आहे.'

रोहितने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर टी-२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो सातत्याने कसोटी क्रिकेट खेळतोय. मात्र त्याला हवी कशी कामगिरी करता आलेली नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेतही त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ५२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला अवघ्या २२ धावा करता आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT