Cricketer Retirement: भारताला मोठा धक्का! BGT सुरु असतानाच स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

Ankit Rajpoot Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरु असताना स्टार भारतीय खेळाडूने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे.
Cricketer Retirement: भारताला मोठा धक्का! BGT सुरु असतानाच स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
team indiasaam tv
Published On

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. सध्या ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. तर मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये सुरु आहे.

दरम्यान ही मालिका सुरु असतानाच भारताच्याव वेगवान गोलंदाजाने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि पंजाबसारख्या संघाचे प्रतिनिधित्व करणारा वेगवान गोलंदाज अंकित राजपूतने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. इथून पुढे तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाही. या गोलंदाजाने वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Cricketer Retirement: भारताला मोठा धक्का! BGT सुरु असतानाच स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
IND vs AUS, Virat Kohli: विराट नेमका कुठं चुकतोय? सतत फ्लॉप होण्यामागचं कारण काय?

अंकित राजपूत २०१३ पासून आयपीएल खेळतोय. मात्र तेव्हापासून ते २०२१ पर्यंत त्याला केवळ २९ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज ,किंग्ज इलेव्हेन पंजाब (पंजाब किंग्ज) आणि राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याला ८० आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५० सामने खेळण्याचा अनुभव आहे.

आता क्रिकेटला रामराम केल्यानंतर तो लेजेंड्स लीग स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतो. या स्पर्धेत निवृत्ती घेतलेले खेळाडू खेळतात. अंकित राजपूतने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे.

Cricketer Retirement: भारताला मोठा धक्का! BGT सुरु असतानाच स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
IND vs AUS: रोहितचा फ्लॉप शो सुरुच...इंग्लंडचा दिग्गज हिटमॅनला भित्रा म्हणाला

अंकितने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ' आज मी खूप आदर आणि विनम्रतेने भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. २००९ ते २०२४ पर्यंतचा प्रवास खूप शानदार होता. मी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय), उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन, कानपूर क्रिकेट असोसिएशन आणि आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, किंग्ज इलेव्हेन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाने जी संधी दिली, त्यांचे मी आभार मानतो.' यासह अंकितने आपले मित्र, कुटुंबातील सदस्य आणि प्रशिक्षकांचे आभार मानले आहेत. यासह त्याच्या सहकारी खेळाडूंनी त्याच्या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com