rohit sharma with virat kohli twitter
क्रीडा

Rohit Sharma Statement: 'फॉर्म चिंतेचा विषय नाही...',आऊट ऑफ फॉर्म विराटला रोहितचा फुल सपोर्ट

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला लोळवत तिसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमिफायनलच्या सामन्यात भारतीय संघाने ६८ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघ फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. दरम्यान या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीबाबत मन जिंकणारं वक्तव्य केलं आहे.

या स्पर्धेसाठी विराट कोहलीला नवीन भूमिका देण्यात आली आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी रोहित आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करणार अशी चर्चा होती. मात्र स्पर्धा सुरु झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला आहे. नेहमी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन संघाचा डाव सांभाळणारा विराट, सलामीला पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याला या स्पर्धेत एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. या सुमार कामगिरीनंतर त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर रोहित शर्मा त्याला सपोर्ट करताना दिसून आला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर रोहितला विराटच्या फॉर्मबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी तो म्हणाला की, ' विराट एक दर्जेदार खेळाडू आहे. कुठल्याही खेळाडूवर ही वेळ येऊ शकते. अशा मोठ्या सामन्यांमध्ये तो किती महत्वाचा खेळाडू आहे, हे आम्हाला माहित आहे. जेव्हा एखादा खेळाडू १५ वर्षांपासून क्रिकेट खेळतोय, तेव्हा फॉर्म हा कधीच महत्वाचा मुद्दा नसतो. त्यामुळे विराटचा फॉर्म हे आमच्यासाठी महत्वाचा नाही. कदाचित त्याने फायनलच्या सामन्यासाठी आपला फॉर्म राखून ठेवला असावा. त्यामुळे फायनलच्या सामन्यासाठी आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देऊ.'

विराटची या स्पर्धेतील कामगिरी पाहिली, तर त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून तो डावाची सुरुवात करतोय. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत १,४,०,२४,३७,० आणि ९ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत तो एकदा गोल्डन डकवर आणि एकदा डकवर बाद झाला आहे. मात्र रोहितला विश्वास आहे की, तो फायनलमध्ये महत्वाची खेळी करु शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : या राशीच्या व्यक्तींचे निर्णय योग्य ठरेल, नव्या दमाने कामाला लागाल, वाचा आजचे राशीभविष्य

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? आज रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

Rashi Bhavishya : मेषसह 5 राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, वाचा राशीभविष्य

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT