Manu Bhaker Saam Tv
क्रीडा

Manu Bhaker: 'नेमबाजीत पदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला', PM मोदींनी केलं मनू भाकरचं कौतुक

PM Modi On Manu Bhaker: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नेमबाज मनू भाकरचे अभिनंदन केले आहे.

Satish Kengar

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नेमबाज मनू भाकरचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी याला अविश्वसनीय यश म्हटले आहे. X वर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

मनू भाकरचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, ''पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकल्याबद्दल मनू भाकर यांचे अभिनंदन. कांस्यपदकाबद्दल अभिनंदन. हे यश अधिक खास आहे कारण ती भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. हे एक अविश्वसनीय यश. ”

नेमबाज मनू भाकरने रविवारी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले. यासह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

मनूने आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत २२१.७ गुणांसह तिसरे स्थान मिळवत कांस्यपदक जिंकले. जेव्हा मनू अंतिम फेरीत बाहेर पडली, तेव्हा ती दक्षिण कोरियाच्या येजी किमपेक्षा फक्त 0.1 गुणांनी मागे होती, जिने अखेरीस 241.3 गुणांसह रौप्य पदक जिंकले.

मनू भाकरचे अभिनंदन करताना केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया म्हणाले आहेत की, ''हा एक अभिमानास्पद क्षण, मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये भारताचे पहिले पदक जिंकले. अभिनंदन मनू, तू तुझे कौशल्य आणि समर्पण दाखवले आहेस, तू ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहेस.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करा; मुदत वाढली; शेवटची तारीख कधी?

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

SCROLL FOR NEXT