FIFA World Cup: महिला FIFA फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात करण्यात आले आहे. स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना न्यूझीलंड आणि नॉर्वे या दोन्ही संघामध्ये रंगणार इतक्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. उद्घाटनाचा सामना सुरू व्हायला काही तास शिल्लक राहिले असताना नॉर्वे संघाच्या हॉटेलजवळ फायरींग करण्यात आली आहे.
या फायरींगमध्ये २ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर ६ जण गंभीर जखमी आहेत. ज्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
या सामन्यावर फायरींगचा कुठलाही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं नाही. हा सामना नियोजित वेळेनुसार सुरू झाला. सामन्यापूर्वी अचानक असा हल्ला झाल्याने आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
या घटनेबाबत बोलताना न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हीपकिंस म्हणाले की, ' हा दहशतवादी हल्ला नाही. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेला कोणत्याही धोक्याशी संबंधित नाही. हा सामना वेळेवर सुरू होईल.' तसेच फायरींग झाल्यानंतर खेळाडूंनी सुरक्षित असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. (Latest sports updates)
शहरात फायरींग होताच तातडीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ही घटना घडल्यानंतर एन फॅन इव्हेंट रद्द करण्यात आला आहे. तसेच इटली संघाचं सराव सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आले आहे. तसेच खेळाडूंना हॉटेलच्या बाहेर न येण्याचे आदेश देण्यात आले होते. उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी देखील हजेरी लावली होती. ते सध्या ऑकलँडमध्ये सुरक्षित ठिकाणी आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.