IND vs WI 2nd Test: भारत - वेस्टइंडीजमध्ये रंगणार 100 वा कसोटी सामना; केव्हा रंगला होता पहिला सामना?

IND vs WI 100 Test Match: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम कसोटीला आजपासून प्रारंभ होणार आहे.
ind vs wi
ind vs wisaam tv
Published On

India vs West indies 100th Test Match: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम कसोटीला आजपासून प्रारंभ होणार आहे. हा भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमधील १०० वा कसोटी सामना असणार आहे.

यापूर्वी हे दोन्ही संघ ९९ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यात वेस्टइंडीज संघाचं पारडं जड राहिलं आहे.

ind vs wi
Team India Playing 11: आता विंडीजचं काही खरं नाही! दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात धाकड खेळाडूची एंट्री; पाहा प्लेइंग 11

या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ९९ सामने खेळले आहेत. यापैकी वेस्टइंडीजने ३० तर भारतीय संघाने २३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ४६ सामने ड्रॉ राहिले आहेत. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. आता १०० व्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Ind vs wi 100th test match)

केव्हा रंगला होता भारत - वेस्टइंडीज पहिला कसोटी सामना?

भारत आणि वेस्टइंडीज हे दोन्ही संघ १० ते १४ डिसेंबर १९४८ रोजी पहिल्यांदा आमने सामने आले होते. त्यावेळी लाला अमरनाथ हे भारतीय संघाचे कर्णधार होते. दिल्लीच्या मैदानावर झालेला हा सामना बरोबरीत समाप्त झाला होता.

त्यानंतर चेन्नईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात वेस्टइंडीजने १ डाव आणि १९३ धावांनी विजय मिळवला होता. (Latest sports updates)

ind vs wi
IND vs WI Weather Update: टीम इंडियाचं मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगणार? दुसऱ्या कसोटीपूर्वी समोर आली मोठी अपडेट

विराट कोहलीसाठी खास असेल हा सामना...

भारत विरुद्ध वेस्टइंडीज हा सामना १०० वा कसोटी सामना असणार आहे. यासह विराट कोहलीसाठी देखील हा सामना अतिशय खास असणार आहे. कारण विराट कोहली आपला ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० सामने खेळणारा १० वा खेळाडू ठरणार आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११ :

यशस्वी जयस्वाल,रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, अंजिक्य रहाणे, ईशान किशन, रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट/ अक्षर पटेल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com