virat kohli yandex
Sports

Virat Kohli One 8 Commune: विराट कोहलीच्या मालकीच्या पबर पोलिसांची कारवाई! नेमकं काय घडलं?

FIR On Virat Kohli One 8 Commune Pub: विराट कोहलीच्या मालकीच्या वन ८ कम्यून पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीने( Virat Kohli) टी-२० वर्ल्डकप (ICC T20 World Cup 2024) जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. सध्या विराट कोहली लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. दरम्यान बंगळुरुतील त्याच्या मालकीच्या पबवर पोलीसांनी कारवाई केली आहे. बंगळुरुतील एमजी रोडवर असलेलं वन८ कम्युन (One 8 commune) हे पब रात्री उशिरापर्यंत सुरु होतं. त्यामुळे पोलीसांनी पब मॅनेजमेंटविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुतील एमजी रोडवर विराट कोहलीच्या मालकीचं वन ८ कम्युन हे पब आहे. वन ८ कम्युनसह इतर पब हे रात्री उशिरापर्यंत सुरु होते. त्यामुळे पोलीस अॅक्शनमध्ये आले कारवाई करत पब मॅनेजमेंटवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरापर्यंत पब सुरु ठेवण्यासह या पबवर आणखी काही आरोप करण्यात आले आहेत. डीसीपी सेंट्रलने एका निवेदनात सांगितले की, ' आमच्याकडे, या पबमध्ये रात्री उशिरापर्यंत मोठ मोठ्या आवाजात गाणी वाजवत असल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. (Virat Kohli News In Marathi)

विराट कोहलीच्या मालकीचं हे पब बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ आहे. रात्री १ वाजेपर्यंत पब सुरु ठेवण्याची परवानगी आहे, असं पोलीसांनी सांगितलं. मात्र ६ जुलै रोजी, वन ८ कम्युन हे पब ठरेलल्या वेळेपेक्षाही जास्त वेळ सुरु होतं. त्यामुळे पब मॅनेजमेंटवर कारवाई करण्यात आली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT