Fifa World Cup 2026, America, Mexico, Canada
Fifa World Cup 2026, America, Mexico, Canada saam tv
क्रीडा | IPL

फिफाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार; अमेरिका, मेक्सिको, कॅनडास विश्वकरंडकाचे यजमानपद

Siddharth Latkar

नवी दिल्ली : सन 2026 मध्ये आयाेजिली जाणारी फिफा विश्वकरंडक स्पर्धेचे (FIFA World Cup) यजमानपद अमेरिका (america), मेक्सिको (mexico) आणि कॅनडा (canada) यांना संयुक्तरित्या मिळाले आहे. फिफाच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन देशांकडे विश्वकरंडक यजमानपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (fifa world cup latest marathi news)

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल (International Federation of Association Football) या फुटबॉलची प्रशासकीय संस्थेने गुरुवारी रात्री विश्वकरंडक स्पर्धेसाठीच्या 16 यजमान शहरांची घोषणा केली. यंदा स्पर्धेत ३२ ऐवजी ४८ संघ सहभागी होणार आहेत. कतारमध्ये (Qatar) विश्वकरंडक स्पर्धेचा चालू हंगाम २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. यामध्ये केवळ 32 संघ असतील.

दरम्यान सन 2026 मध्ये होणाऱ्या स्पर्धेत 80 पैकी 60 सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये प्रत्येकी दहा सामने खेळवले जाणार आहेत. अमेरिकन फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष कार्लोस कॉर्डेरियो यांनी उत्तर अमेरिकेतील फुटबॉल जगतासाठी हा एक अनोखा आणि मोठा क्षण असल्याचे म्हटले.

अमेरिकेत येथे हाेणार सामने

अटलांटा (Atlanta), बोस्टन (Boston), डॅलस, ह्यूस्टन, कॅन्सस, लॉस एंजेलिस, मियामी, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, सिएटल.

मेक्सिको: ग्वाडालजारा (Guadalajara), मेक्सिको सिटी (Mexico City), मॉन्टेरी (, Monterrey)

कॅनडा: टोरंटो (Toronto), व्हँकुव्हर (Vancouver)

20 वर्षांपूर्वी जपान-कोरियाकडे हाेते यजमानपद

20 वर्षांपूर्वी 2002 मध्ये जपान आणि दक्षिण कोरियाने मिळून विश्वकरंडकाचे आयोजन केले होते. मॉस्को येथे आयोजित 68 व्या FIFA काँग्रेस परिषदेत, राष्ट्रीय फुटबॉल संघटनांनी अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्या बाजूने मतदान केले हाेते.

मतदानात मोरोक्कोचा (Morocco) पराभव केला

मॉस्को येथे झालेल्या FIFA परिषदेत अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांनी 2026 च्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी संयुक्तपणे आपली ताकद लावली. या तिघांनीही हक्काच्या निवडणुकीत मोरोक्कोचा पराभव केला होता. 200 हून अधिक राष्ट्रीय फुटबॉल संघटनांनी मतदान केले हाेते. संयुक्त दाव्याला 134 मते मिळाली, तर मोरोक्कोला केवळ 65 मते मिळाली हाेती.

फिफा विश्वकरंडक सर्वात लोकप्रिय क्रीडा स्पर्धा

फिफा विश्वकरंडक स्पर्धा ही फुटबॉलची सर्वात लाेकप्रिय क्रीडा (sports) स्पर्धा मानली जाते. लोकप्रियतेच्या दृष्टीने या स्पर्धेची तुलना ऑलिम्पिक स्पर्धेशी केली जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे सामन्यांना हाेणारी प्रेक्षकांची लक्षणीय गर्दी. सन 1930 मध्ये जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा साऱ्या जगाच्या नजरा त्यावर खिळलेल्या हाेत्या. ही स्पर्धा चार वर्षांतून एकदा आयोजित केली जाते. गतवर्षी ही स्पर्धा फ्रान्सने जिंकली होती, तर पहिला फुटबॉल विश्वकरंडक उरुग्वेने जिंकला होता.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train News | ऐन कामाच्या वेळी लोकलमध्ये बिघाड, चाकरमान्यांचे हाल

Health Tips: रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नका हे ३ पदार्थ, नाहीतर

Antibiotics Awareness : गरज नसताना औषध घेतल्याने ओढावेल मृत्यू; डॉक्टरांनी दिलेली माहिती वाचा सविस्तर

Mumbai News: मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग; तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार, मुंबईत काय घडलं?

Breakfast Recipe: सोप्या पद्धतीचे इंडियन नुडल्स; चिमुकले होतील खुश

SCROLL FOR NEXT