सातारा (udayanraje bhosale latest marathi news) : खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी आज (शुक्रवार) राज्याचे (maharashtra) उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचा नामाेल्लेख टाळत त्यांच्यावर सडकून टीका केली. माझ्याबाबत काेण काय बाेलले मला माहिती नाही. पण माझ्यावर खाेट्या केसेस करुन मला संपविण्याचा प्रयत्न करणा-यांनी लक्षात ठेवावे सत्ता आहे ताेपर्यंतच, त्यानंतर... काय. दरम्यान एवढेच असेल ईडीच्या चाैकशीस सामाेरे जावू असेही राजेंनी म्हटले. (satara latest marathi news)
सातारा जिल्ह्यातील मलवडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना जिल्ह्यातील माण (mann), खटाव (khatav) आणि सातारा (satara) तालुक्यात खंडणीखाेरांचे प्रमाण वाढले आहे असे माझ्या कानावर सातत्याने येत आहे. अपप्रवृत्तींचा बंदाेबस्त करा अशी सूचना एसपींना केल्याचे म्हटले हाेते.
साता-याच्या एमआयडीसी मधील खंडणीबाबत मंत्री पवार यांनी त्यांच्या भाषणात काेणाचा ही विशेष उल्लेख न करता समाचार घेतला हाेता. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार यांना साता-याच्या एमआयडीसीतील खंडणीखोर कोण तुम्हांला माहित नाही, कधी तरी खरं बाेलायला शिका अशी टिप्पणी केली हाेती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राेख खासदार उदयनराजे भाेसले यांच्यावर हाेता. परंतु त्यांना त्यांचा नामाेल्लेख टाळला हाेता.
आज माध्यम प्रतिनिधींनी उदयनराजे भाेसले यांना सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात याबाबत छेडले. उदयनराजे म्हणाले माझा लढा हा भ्रष्टाचा-यांशी आहे. काेणत्या पक्षासाेबत अथवा वैयक्तिक काेणाशी माझा लढा नाही. मी खंडणी मागताे असे जे काेणी म्हणत असेल त्यांनी समाेर यावे. माध्यमांशी समाेर यावे. इतकीच जर हिम्मत असेल तर चला ईडी, सीबीआयच्या चाैकशीला सामाेरे जाऊ या. आहे का तुमच्यात दम. उगीच फालतू दाेन लाखांची खंडणी मागितल्याचा आराेप करणे. ही काय पद्धत झाली का.
विकासकामे करायची नाहीत का असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला. लाेकप्रतिनिधींना एक लक्षात ठेवावे ज्यावेळी तुमचा कार्यकाळ संपताे. त्यानंतर कर्मचारी सुद्धा तुमच्याकडे पाहत नाही. आपलं तसं नाहीये. स्टाईल इज स्टाईल असे म्हणत उदयनराजेंनी काॅलर उडवली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.