ishan kishan news :  Saam tv
Sports

6,6,6,6... ईशान किशनने नामीबियाला धुतलं; वादळी खेळीने मोडले अनेक विक्रम

ishan kishan news : ईशान किशनने नामीबियाला चांगलंच धुतलं आहे. ईशानने वादळी खेळीने अनेक विक्रम मोडले आहेत .

Vishal Gangurde

ईशान किशनने ६१ धावांची वादळी खेळी खेळली

त्याने २० चेंडूत अर्धशतक ठोकलं

पॉवरप्लेमध्ये अर्धशतक करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरलाय

नामीबियाच्या विरोधात आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या १८ व्या सामन्यात सलामीवीर ईशान किशनने वादळी खेळी खेळली आहे. ईशानने २४ चेंडूत ६१ धावा केल्या आहेत. यात ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. ईशानने सुरुवातीलाच आक्रमक खेळी खेळत नामीबियाच्या गोलंदाजांना चांगलंच झोडलं. ईशानने २० चेंडूवर अर्धशतक पूर्ण केलं.

ईशान किशनने सहा षटकात जेजे स्मिटचा चांगलाच समाचार घेतला. जेजेच्या षटकातील पहिल्या चेंडूत कोणताही धाव ईशानने केली नाही. त्यानंतर त्याने सलग ४ षटकार लगावले. शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला. ईशानने जेजे स्मिटच्या षटकात २८ धावा कुटल्या. त्याने टी२० विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा केल्या आहेत.

ईशान किशनने रोहित शर्माची बरोबरी साधली आहे. रोहित शर्माने २०२४ साली झालेल्या टी२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रलिया गोलंदाज मिचेल स्टार्कने २८ धावा कुटल्या होत्या. २००७ साली झालेल्या टी२० वर्ल्डकपमध्ये गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सलग ३६ धावा कुटल्या होत्या.

ईशान किशनने आतापर्यंत टी२० विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक जलद अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. टी२० वर्ल्डकपमध्ये ईशानहून जलद अर्धशतक हे युवराज सिंह, केएल राहुल आणि रोहित शर्माने केलं आहे. ईशान तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. ज्याने टी२० वर्ल्डकपच्या सामन्यातील पॉवरप्लेमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.

ईशानआधी रोहित शर्मा, केएल राहुलने विक्रम केला आहे. ईशान टी२० वर्ल्डकपमध्ये अर्धशतकीय खेळी खेळणारा पहिला विकेटकिपर खेळाडू ठरला आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाने ६.५ षटकात १०० धावा केल्या. टी२० विश्वकपच्या इतिहासातील सर्वात जलद शतक धावा भारताच्या झाल्या आहेत. याआधी नेदरलँडने २०१४ साली सिलहट मैदानात आयरलँडच्या विरोधात ७ षटकात शतकी धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दादांच्या विमान अपघातावरून खळबळजनक दावा, विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद होता?

बेरोजगारांना महिन्याला मिळणार 2500 रुपये? केंद्र सरकारची बेरोजगारांसाठी नवी योजना?

एफआयआर करा किंवा विशेषाधिकार प्रस्ताव आणा, मी घाबरणार नाही; राहुल गांधी मोदी सरकारवर भडकले

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुली होत्या? पुढे त्यांचं काय झालं...

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या पुणे दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT