faf du plessis statement after rcb vs kkr match royal challengers bangalore vs kolkata knight riders match news in marathi saam tv news
Sports

RCB vs KKR,IPL 2024: गोलंदाजी, फलंदाजी नव्हे तर या कारणामुळे RCB ने गमावला सामना; फाफ डू प्लेसिसने सांगितलं खरं कारण

Faf Du Plessis Statement: या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

IPL 2024,Faf Du Plessis Statement:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने शानदार खेळ करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आपल्या घरच्या मैदानावर पराभूत केलं आहे. गेल्या सामन्यात शानदार विजय मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला या सामन्यात ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

या सामन्यानंतर बोलताना फाफ डू प्लेसिस म्हणाला की, ' आश्चर्याची गोष्ट आहे, जेव्हा खेळाडूंनी कटर्स , बॅक ऑफ द लेंथ चेंडू टाकले तेव्हा खेळाडू संघर्ष करताना दिसून आले. आम्हाला वाटलं होतं की, ही चांगली धावसंख्या आहे. मैदानावर दव होते. दव असतानाही आम्ही पहिल्या डावात फलंदाजी केली. विराट फलंदाजीत संघर्ष करत होता. कारण चेंडू बॅटवर येत नव्हता.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' एक किंवा दोन गोष्टी आम्ही करू शकलो असतो. सुनील नरेन आणि सॉल्टने चांगली फलंदाजी केली आणि आमच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. त्यांनी मजबूत क्रिकेटींग शॉट्स मारत सामना आमच्यापासून दूर नेला. सुनील नरेन फलंदाजी करत होता. त्याच्यासमोर फिरकी गोलंदाजाला गोलंदाजी देऊ शकत नाही. दुसरीकडे फिल सॉल्टनेही शानदार फलंदाजी केली. (Cricket news in marathi)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली आणि कॅमेरून ग्रीनने ३३ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकअखेर ६ गडी बाद १८२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना वेंकटेश अय्यरने ५०, सुनील नरेनने ४७ आणि सॉल्टने ३० धावा करत संघाला शानदार विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT