RCB vs KKR : विराटची धमाकेदार खेळी; आरसीबीचं KKR समोर 183 धावांचं आव्हान

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders : विराट कोहलीच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर रॉयल चैलेंजर्स बेंगलोर ने कोलकाता नाईट रायडर्स समोर १८3 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. नाणेफेक गमाल्यांनतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने चांगली कामगीरी केली.
RCB vs KKR
RCB vs KKRSaam Digital
Published On

RCB vs KKR /IPL 2024

विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जारोवर रॉयल चैलेंजर्स बेंगलोर ने कोलकाता नाईट रायडर्स समोर 183 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. नाणेफेक गमावल्यांनतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने चांगली कामगीरी केली. विराट कोहलीने अप्रतिम खेळी करत ८३ धावा केल्या आहेत. या मैदानावर आरसीबीला २०१६ पासून एकदाही परावभव करता आलेला नाही. आरसीबीने ६ बाद १४२ धावा करून १८३ धावांचं केकेआरला १८३ धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्यादरम्यान गौतम गंभीर विराट कोहलीचं कौतुक करानाही दिसला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी हा एक सुखद क्षण होता.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस ८ धावातचं तंबूत परतला. केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणेने त्याला झेलबाद केलं. त्यानंतर आलेल्या कॉमरॉन ग्रीनने आक्रमक फलंदाजी करत ३३ धावा केल्या. मात्र त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने संघाला सावरलं होतं. मॅक्सवेल २८ धावांवर झेलबाद झाला. तर रजत पाटीदारला मोठी धावसंख्या करता आली नाही. विराट कोहलीने एकट्याने खिंड लढवली. त्याने ५९ चेंडूत ८३ धावा केल्या. अखेरच्या क्षणी दिनेश कार्तिकने संघासाठी महत्त्वाची साथ दिली. त्याने ८ चेंडूत २० धावा केल्या आहे.

RCB vs KKR
RR VS DC सामन्यात रिषभ पंत प्रचंड संतापला; रागाच्या भरात असं काय केलं? VIDEO व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (w), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

कोलकाता नाइट रायडर्स

फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

RCB vs KKR
IPL 2024 : बेंगळुरुत विराट- गंभीर आमने-सामने! KR आणि RR टीममध्ये मोठा बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com