IPL 2024 : बेंगळुरुत विराट- गंभीर आमने-सामने! KR आणि RR टीममध्ये मोठा बदल

IPL 2024 Latest News : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ९ सामने झाले आहेत. आज शुक्रवारी कोलकाता नाइट राइडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे.
kkr vs rr
kkr vs rrsaam tv
Published On

IPL 2024 KKR And RR Squad Changed:

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ९ सामने झाले आहेत. आज शुक्रवारी कोलकाता नाइट राइडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. आजचा हा सामना होण्याआधी या दोन्ही संघात मोठे बदल करण्यात आले आहे.

कोलकाता नाइट राइडर्समध्ये केकेआरच्या संघात अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागी अफगाणिस्तानच्या १६ वर्षीय स्पिनरला संघात स्थान दिलं आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या रॉयल्समध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या ऐवजी दुसऱ्या खेळाडूला संघात स्थान दिलं आहे.

kkr vs rr
SRH vs MI, IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ज्युनिअर रबाडाला धू धू धुतला! ११ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

आयपीएलमध्ये कोणत्या 2 खेळाडूंची झाली एन्ट्री?

केकेआर आणि राजस्थान रॉयल्स टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. केकेआरच्या संघात अफगाणिस्तानचा १६ वर्षीय फिरकीपटू मोहम्मद गजनफरला संघात स्थान मिळालं आहे. त्याने नुकतंच आर्यलँड संघाच्या विरोधात पदार्पण केलं. त्याने आतापर्यंत दोन वनडे इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. गजनफरला २० लाखांच्या बेस प्राइसनंतर संघात स्थान मिळालं. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघात दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराजाला संघात स्थान मिळालं आहे.

दोन्ही संघाची चांगली सुरुवात

आयपीएलमध्ये या दोन्ही संघांनी चांगली सुरुवात केली आहे. केकेआरने पहिला सामना हैदराबादच्या विरोधात जिंकला. या सामन्यात आंद्रे रसेलने तुफानी खेळी दाखवली. तर राजस्थान रॉयल्सने सुरुवातीचे दोन्ही सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचा जलवा पाहायला मिळाला. तर दुसऱ्या सामन्यात रियान परागने चांगला खेळ दाखवला.

kkr vs rr
SRH vs MI, IPL 2024: मुंबई इंडियन्सला या चुका नडल्या! इरफान पठाणने केली हार्दिकच्या निर्णयांची 'चिरफाड'

केकेआरचा संभाव्य संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोड़ा, फिल साल्ट, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क, मोहम्मद गजनफर, शेरफेन रदरफोर्ड, गुस अॅटिंकसन, मनीष पांडे, केएस भरत, चेतन सकारिया, अंगकृश रघुवंशी, रमनदीप सिंह, शाकिब हुसैन

राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ

संजू सॅमसन (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, केशव महाराज, नवदीप सैनी, आवेश खान, यशस्वी जैस्वाल, कुलदीप सेन, संदीप शर्मा, जोस बटलर, ट्रेंट बोल्ट, अॅडम जॅम्पा, शिमरोन हेटमायर, डोनोवन फरेरा, रोवमेन पॉवेल, शुभमन दुबे, रियान पराग, ध्रुव जुरेल, कुणाल सिंह राठोड, नांद्रे बर्गर, टॉम कोल्हर कॅडमोर, आबिद मुश्ताक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com