SRH vs MI, IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ज्युनिअर रबाडाला धू धू धुतला! ११ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

Kwena Maphaka Record: मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या क्वेना मफाकाच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
kwena maphaka poor bowling show in srh vs mi ipl 2024 match breaks 11 year old record
kwena maphaka poor bowling show in srh vs mi ipl 2024 match breaks 11 year old record twitter

SRH vs MI, Kwena Maphaka Record:

मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादकडून ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकअखेर २७७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला २४६ धावा करता आल्या. दरम्यान आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या क्वेना मफाकाच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

मुंबई इंडियन्सने या सामन्यात १७ वर्षीय गोलंदाज क्वेना मफाकाला पदार्पण करण्याची संधी दिली. मात्र त्याला आपली छाप सोडता आली नाही. मफाकाच्या गोलंदाजीवर हैदराबादच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. आपल्या पहिल्याच सामन्यात मफाकाने ४ षटकात ६६ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याला एकही फलंदाजाला बाद करता आलं नाही. या सामन्यात त्याने १६.५० च्या इकोनॉमिने धाावा खर्च केल्या. ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात कुठल्याही गोलंदाजाने पहिल्या सामन्यात केलेली सर्वात खराब कामगिरी आहे.( Cricket news in marathi)

kwena maphaka poor bowling show in srh vs mi ipl 2024 match breaks 11 year old record
SRH vs MI,IPL 2024: मुंबई इंडियन्समध्ये भाकरी फिरणार? सामन्यानंतर रोहित अन् आकाश अंबानीमध्ये काय चर्चा झाली?

मफाकाने ६६ धावा खर्च करत सर्वात खराब कामगिरीची नोंद केली आहे. यासह त्याने मायकल नेसरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. मायकल नेसरने २०१३ मध्ये पंजाब किंग्स संघासाठी पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ४ षटकात ६२ धावा खर्च केल्या होत्या.आता क्वेना मफाकाच्या नावे या नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वात खराब गोलंदाजी करणारे गोलंदाज..

क्वेना मफाका - ०/६६ धावा (मुंबई इंडियन्स)

मायकल नेसर - ०/६२ धावा (पंजाब किंग्स )

मशरफे मुर्तजा - ०/५८ धावा( कोलकाता नाईट रायडर्स )

प्रयास रे बर्मन - ०/५६ धावा ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)

kwena maphaka poor bowling show in srh vs mi ipl 2024 match breaks 11 year old record
SRH vs MI,Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर माजी क्रिकेटपटू भडकला! मोठं वक्तव्य करत सांगितली चूक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com