new zealand vs england match Saam tv
Sports

न्यूझीलंडच्या पराभवामुळे पाकिस्तानला फायदा; इंग्लंडच्या विजयामुळे पॉईंट टेबलमध्ये उलटफेर

new zealand vs england : न्यूझीलंडच्या पराभव झाल्याने पाकिस्तानला फायदा झाला आहे. इंग्लंडच्या विजयामुळे पॉईंट टेबलमध्ये उलटफेर झाला आहे.

Vishal Gangurde

टी२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानला सुपर-८ चा शेवटचा सामना खेळणे बाकी आहे. या स्पर्धेत पाकिस्तानची धाकधूक वाढली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये सामना झाला. या सामन्यावर पाकिस्तानची नजर होती. या सामन्यात इंग्लंडचा ४ विकेटने न्यूझीलंडवर विजय मिळवल्याने पाकिस्तानला फायदा झाला आहे.

टी२० विश्वकप २०२६ मध्ये पाकिस्तानची घौडदौड सुरूच राहणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडदरम्यान इंग्लिंश संघाने सामना जिंकल्याने पाकिस्तानचं स्पर्धेत स्थान कायम राहिलं. इग्लंड आधीच सेमीफायनला पोहोचली आहे. न्यूझीलंडने आजचा सामना जिंकला असता तर थेट सेमी फायनलमध्ये पोहोचला असता. परंतु पराभवानंतरही न्यूझीलंडकडे तीन गुण आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधून कोणता संघ सेमी फायनलला जाणार, पुढील सामन्यात ठरणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकात ७ गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या. इंग्लंडसमोर विजयासाठी १६० धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा फलंदाज फिल अवघ्या दोन धावांवर बाद झाला. बटलर देखील शून्य धावांवर बाद झाला. मागील सामन्यात शतक ठोकणारा हॅरी ब्रूक स्वस्तात माघारी परतला. न्यूझीलंडने सामन्यात वर्चस्व मिळवलं होतं. परंतु अतितटीच्या सामन्यात शेवटच्या षटकात इंग्लंडने बाजी मारली.

पाकिस्तान आणि श्रीलंकेचा २८ फेब्रुवारीला सामना

पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान एक सेमी फायनल सामना होणार आहे. इंग्लंडने सामना जिंकून आधीच सेमी फायनलमधील स्थान निश्चित केले. पाकिस्तानला सुपर-८ मधील शेवटचा सामना श्रीलंकेशी खेळायचा आहे. पराभवानंतरही न्यूझीलंडचा रन रेट कमी झाला नाही. तर पाकिस्तानच्या टीमचा पराभव श्रीलंकेने केला, तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर जाईल. पाकिस्तानचा विजय झाला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे एकसारखे गुण झाले, तर सेमी फायलनला कोण जाणार, हे रन रेटवरून ठरवले जाईल. एकंदरीत स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघासाठी अधिक रन रेट असणे फायदेशीर ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:पुसद-अमरावती मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर नागरिकांची कोंडी

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार, मोदी-ममतांची प्रतिष्ठा पणाला

Shocking : भयानक! चैन खेचून रेल्वे थांबवली अन् तरूणीला जबरदस्ती नेलं; ६ जणांनी केला सामूहिक बलात्कार

Tomato Buying Tips: गावरान टोमॅटो कसा ओळखाल? खरेदी करण्यापूर्वी ५ गोष्टी लक्षात ठेवाच

Weekly Horoscope: या आठवड्यात नशिबाची साथ कोणाला? तुमच्या राशीनुसार जाणून घ्या यश-अपयशाचे संकेत

SCROLL FOR NEXT