England's playing XI for the Manchester Test against India saam tv
Sports

Ind vs Eng Test : इंग्लंडचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; मँचेस्टर कसोटीच्या २ दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, जादुई खेळाडूची ८ वर्षांनी एन्ट्री

England playing XI :भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे. चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच इंग्लंडनं प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात ८ वर्षांनी जादुई गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे.

Nandkumar Joshi

  • इंग्लंडने ४३ तास आधीच चौथ्या कसोटीसाठी संघ जाहीर करून दिला आश्चर्याचा धक्का

  • ८ वर्षांनी लियम डॉसनचं कसोटीत पुनरागमन

  • बोटाच्या दुखापतीमुळे शोएब बशीर मालिकेबाहेर

  • इंग्लंड २-१ ने मालिकेत आघाडीवर

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडनं प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. मँचेस्टरमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याच्या २४ तास आधी नव्हे, तर ४३ तास आधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर करून इंग्लंडनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सध्या इंग्लंडचा संघ या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात २३ जुलैपासून चौथा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघानं आपल्या संघात एक बदल केला आहे. जवळपास ८ वर्षांनंतर फिरकीपटू लियम डॉसन याचं संघात पुनरागमन झालं आहे.

बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडच्या संघानं लॉर्ड्स कसोटीत भारताला २२ धावांनी नमवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या सामन्यातील अखेरची विकेट फिरकीपटू शोएब बशीरने घेतली होती. बशीरनं घेतलेली ही विकेट त्याची या कसोटी मालिकेतील अखेरची विकेट ठरली. कारण बोटाला झालेल्या दुखापतीमुळं तो मालिकेतून बाहेर झाला आहे. इंग्लंड संघाच्या सिलेक्टर्सने चौथ्या आणि पाचव्या कसोटीसाठी फिरकीपटू आणि ऑलराउंडर लियम डॉसनला संघात स्थान दिलं होतं.

इंग्लंडनं याच डॉसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं आहे. चौथ्या कसोटीसाठी हा संघातील एकमेव बदल असणार आहे. फॉर्मशी झुंज देणाऱ्या सलामीवीर जॅक क्रॉली आणि उपकर्णधार ओली पोपला आणखी एक संधी देण्यात आली आहे. डॉसनच्या बाबतीत सांगायचं झालं तर, या ३५ वर्षीय खेळाडूची कहाणी देखील भारतीय संघाचा फलंदाज करूण नायरसारखीच आहे. नायरसारखेच डॉसन यानंही २०१६ मध्ये भारत-इंग्लंड मालिकेत पदार्पण केलं होतं. मात्र, तीन सामन्यांनंतर २०१७ मध्ये तो संघाच्या बाहेर झाला होता. त्यानंतर ज्या प्रकारे नायरनं इंग्लंडच्या दौऱ्यात संघात पुनरागमन केलं, तसंच डॉसनला दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

अशी असेल इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

बेन स्टोक्स (कॅप्टन), जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ, लियम डॉसन, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.

इंग्लंडने चौथ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन कधी जाहीर केली?

इंग्लंडने सामना सुरू होण्याच्या तब्बल ४३ तास आधी म्हणजे दोन दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली.

लियम डॉसन कोण आहे?

लियम डॉसन हा इंग्लंडचा अनुभवी फिरकीपटू आहे. २०१७ नंतर ८ वर्षांनी तो कसोटी संघात पुनरागमन करत आहे.

इंग्लंडच्या संघात आणखी कोणते बदल झालेत?

संघात फक्त एकच बदल करण्यात आला आहे – बशीर मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी डॉसनला संघात संधी दिली आहे.

मँचेस्टर कसोटी कधी आणि कुठे होणार आहे?

चौथी कसोटी २३ जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT