brendon mccullum yandex
Sports

IND vs ENG: दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव निश्चित? इंग्लंडच्या हेड कोचने सांगितला प्लान

England Plan For IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा हेड कोच ब्रँडन मॅक्क्यूलमने मोठा खुलासा केला आहे .

Ankush Dhavre

Brendon McCullum On IND vs ENG 2nd Test:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतीय संघाला २८ धावांनी धूळ चारली. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने खास प्लान केला आहे.

हैदराबाद कसोटीत फिरकी गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने दुसऱ्या डावात ७ गडी बाद केले. हे भारतीय संघाला भलतच भारी पडलं. SENZ रेडिओवर चर्चा करताना ब्रेंडन मॅक्क्यूलम म्हणाला की, ' आम्ही vizag मध्ये भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत सर्व ४ फिरकी गोलंदाजांना संधी देऊ शकतो.'

हैदराबाद कसोटीत भारतीय संघाने मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोन्ही वेगवान गोलंदाजांना संधी दिली होती. तर इंग्लंडकडून एकमेव वेगवान गोलंदाज मार्क वूडला संघात स्थान दिलं गेलं होतं. तर फिरकी गोलंदाज म्हणून जॅक लीच, टॉम हार्टले आणि रेहान अहमद यांना संघात स्थान दिलं होतं.

इंग्लंडचा फिरकी गोलंदाज खेळवण्याचा प्लान सुपरहिट ठरला. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना भारतीय फलंदाज अडचणीत येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे इंग्लंडचा संघ आता आपल्या सर्व फिरकी गोलंदाजांना खेळवण्याच्या विचारात आहे. असं झाल्यास इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये एकही वेगवान गोलंदाज दिसणार नाही. (Cricket news in marathi)

भारतीय संघाचा पराभव..

हैदराबाद कसोटीत भारतीय संघाने मजबूत पकड बनवली होती. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव स्वस्तात गुंडाळून भारतीय संघाने ४०० धावांचा आकडा पार केला. यासह पहिल्या डावात १९० धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने देखील ४०० पेक्षा अधिक धावा केल्या. इंग्लंडकडून ओली पोपने १९६ धावांची खेळी केली. हा सामना जिंकायला भारतीय संघाला २३१ धावांची गरज होती. मात्र भारतीय संघाचा डाव २०२ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT