Harry Brook google
Sports

IPL 2025: आयपीएलची सर्वात मोठी बातमी, ६.२५ कोटींच्या तगड्या खेळाडूवर लागू शकते २ वर्षाची बंदी

Harry Brook Withdraws From of IPL 2025: इंग्लिश क्रिकेटर हॅरी ब्रुकने आयपीएल २०२५ सुरु होण्याच्या काही दिवसाआधी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्याच्यावर दोन हंगामांसाठी बंदी घातली जाऊ शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुकने आयपीएल २०२५ मधून आपले नाव मागे घेतले आहे. सलग दुसऱ्या वर्षी हॅरी ब्रुकने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. २६ वर्षीय खेळाडूने सोशल मीडीयावर पोस्ट करत याची माहिती दिली. हॅरीने स्पष्ट केले की, त्याची प्राथमिकता इंग्लंड क्रिकेट आहे. ब्रुक इंग्लंडच्या संघाचा कर्णधार पदाच्या शर्यतीतला प्रबळ दावेदार आहे. यामुळे त्याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला.

ब्रूक आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणार होता. दिल्लीने त्याला मेगा लिलावात ६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. आजीच्या गंभीर प्रकृतीमुळे ब्रुकने २०२४ च्या आयपीएलमधून देखील नाव मागे घेतले होते. आता पुन्हा एकदा ब्रूकने आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले आहे आणि नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याच्यावर दोन हंगामांसाठी बंदी घातली जाऊ शकते. ESPNcricinfo मधील एका वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गेल्या आठवड्यात BCCI आणि दिल्ली कॅपिटल्सना कळवले होते की हॅरी ब्रुक आयपीएल २०२५ मध्ये सहभागी होणार नाही. कॅपिटल्सने ब्रूकवर आरटीएम वापरला नाही पण लिलावात त्याला ६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

हॅरी ब्रुकची आयपीएल २०२५ मधून माघार

हॅरी ब्रूकने त्याच्या सोशल मीडिया हँडलद्वारे आयपीएल २०२५ मध्ये सहभागी न होण्याच्या वृत्ताची पुष्टी केली. हॅरी ब्रुकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, 'आगामी आयपीएलमधून माघार घेण्याचा मी खूप कठीण निर्णय घेतला आहे. मी दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या समर्थकांची बिनशर्त माफी मागतो. मला क्रिकेट आवडतं. मी लहान असताना माझ्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहायचो. या पातळीवर खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा मी गांभीर्याने विचार केला. इंग्लंड क्रिकेटसाठी हा एक महत्त्वाचा काळ आहे आणि मी आगामी मालिकेच्या तयारीसाठी पूर्णपणे वचनबद्ध राहू इच्छितो. हे करण्यासाठी मला माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वात व्यस्त काळात रिचार्ज करण्यासाठी वेळ हवा आहे. मला माहित आहे की प्रत्येकजण मला समजेल असे नाही आणि मी त्यांच्याकडून अशी अपेक्षाही करत नाही, परंतु माझ्यासाठी जे योग्य आहे त्यावर मला विश्वास ठेवावा लागेल आणि माझ्या देशासाठी खेळणे ही माझी प्राथमिकता आहे. मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे'.

ब्रुकवर लागू शकतो दोन वर्षाचा बॅन

आयपीएल सुरु होण्याच्या काही दिवसाआधी आयपीएल मधून माघार घेण्याचा निर्णय हॅरी ब्रुकला बॅन लागू शकतो. आयपीएलने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आठ मार्गदर्शक त्त्वे लागू केली होती. त्यातल्या एका तत्वानुसार, कोणताही परदेशी खेळाडू जो लिलावासाठी नोंदणी करतो आणि लिलावात निवड झाल्यानंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वतःला उपलब्ध करुन देत नसेल तर, त्याच्यावर दोन हंगामांसाठी बंदी घातली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT