England captain Eoin Morgan Likely To retirement Latest News SAAM TV
Sports

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी; वर्ल्डकप विजेता कर्णधार घेणार संन्यास

वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार लवकरच क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होणार असल्याचे वृत्त आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंडला वनडे वर्ल्डकप २०१९ जिंकून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन या आठवड्यात मोठी घोषणा करू शकतो. रिपोर्ट्सनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तो रामराम करणार असल्याचे कळते. क्रिकेटमधून संन्यास घेण्याच्या तो विचारात आहे. २०१९ वर्ल्डकप स्पर्धेनंतर त्याचा फॉर्म हरवलेला आहे. त्याच्या बॅटमधून हव्या तशा धावा निघालेल्या नाहीत. (England captain Eoin Morgan Likely To retirement from international cricket soon Says Reports)

बॅटमधून धावा निघत नसल्याने इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. जर मॉर्गनने निवृत्ती जाहीर केली तर, त्याची जागा जोस बटलर घेऊ शकतो.

एका रिपोर्टनुसार, कर्णधार म्हणून आपल्या कारकीर्दीत मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात खेळाचं स्वरूप बदलण्याचे श्रेय मॉर्गनला दिलं जातं. मात्र, २०१९ वर्ल्डकप जिंकल्यानंतर (Cricket World Cup) त्यानं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये केवळ एकच शतक केलं आहे. नेदरलँडविरोधात खेळल्या गेलेल्या दोन वनडे मॅचमध्ये तो सपशेल अपयशी ठरला होता.

दुसरीकडे, बटलर आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल २०२२ मध्ये खेळताना बटलरने ऑरेंज कॅप मिळवली होती. त्याने अलीकडेच नेदरलँडविरोधात केवळ ७० चेंडूंमध्ये नाबाद १६२ धावा कुटल्या होत्या.

रिपोर्ट्सनुसार, मॉर्गनने एक किंवा दोन क्रिकेट प्रकारांसाठी आपला वेळ द्यायला हवा का, असा प्रश्न विचारला जात आहे. अशात आता बटलरकडे कर्णधारपदाची जबाबदारी द्यायला हवी, असा एक मतप्रवाह आहे. बटलरने उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करून वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. त्यानंतर मॉर्गनला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला फलंदाजीत लय सापडलेली नाही. त्याने ऑगस्ट २०२० पासून मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात एकूण २६ इनिंगमध्ये केवळ एक अर्धशतकी खेळी केली आहे. २०१९ वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्यानंतर त्याने केवळ आयर्लंडविरुद्ध एक शतक केलं आहे.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT