इतिहास घडला; रणजी करंडकावर मध्य प्रदेशची माेहर; बलाढ्य मुंबईस हरवलं

मध्य प्रदेश संघास आज (रविवार) विजयासाठी १०९ धावांचे आव्हान हाेते.
ranji trophy 2022, mumbai, madhya pradesh, ranji trophy championship, ranji trohpy
ranji trophy 2022, mumbai, madhya pradesh, ranji trophy championship, ranji trohpysaam tv

बंगळुर : तब्बल 88 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर रणजी करंडकावर (ranji trophy) मध्य प्रदेश संघाने (madhya pradesh) आज माेहाेर उमटविली. मध्य प्रदेशने 41 वेळा अजिंक्यपद मिळविणा-या मुंबई (mumbai) संघावर सहा गडी राखून विजय मिळविला. या विजयानंतर मध्य प्रदेश संघाचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मध्य प्रदेशातील क्रीडाप्रेमींनी अभिनंदनाचा वर्षाव केला. (ranji trophy 2022 latest marathi news)

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मध्य प्रदेश विरुद्ध मुंबई अंतिम सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करीत 374 धावा केल्या हाेत्या. त्यास प्रत्युत्तरात मध्य प्रदेश संघाने यश दुबे (yash dubey), शुभम शर्मा (shubham sharma) आणि रजत पाटीदार (rajat patidar) यांच्या शतकांच्या जोरावर 536 धावा केल्या. त्यानंतर मुंबईचा दुसरा डाव केवळ 269 धावांत गुंडाळला गेला. मध्य प्रदेश संघास आज (रविवार) विजयासाठी १०९ धावांचे आव्हान हाेते.

ranji trophy 2022, mumbai, madhya pradesh, ranji trophy championship, ranji trohpy
योगी आदित्यनाथांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; घटनेनंतर लखनौला रवाना

मध्य प्रदेशची सुरुवात काहीशी खराब झाली. अवघ्या दाेन धावा झाल्या असताना संघाचा एक गडी बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या हिमांशू मंत्रीने (himanshu mantri) शुभम शर्माच्या (shubham sharma) साथीने दुसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. हिमांशू ३७ धावा करून बाद झाला. त्यानंतर पार्थ साहनी मैदानात आला. मात्र त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. पार्थ पाच धावांवर बाद झाला. त्यानंतर पहिल्या डावात शतक झळकावणारा राजद पाटीदारने संघाची बाजू सांभाळात विजयाकडे मार्गक्रमण केले. रजत पाटीदार 30 धावांवर नाबाद राहिला.

ranji trophy 2022, mumbai, madhya pradesh, ranji trophy championship, ranji trohpy
ही तर परिवर्तनाची नांदी ! एकनाथ शिंदेंसह बंडखाेर शिवसैनिकांनी केलं शंभूराज देसाईंचे अभिनंदन

सीएम शिवराज यांचे अभिनंदन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकल्याबद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन केले आहे. त्याने ट्विट केले की, मध्य प्रदेश संघाने मुंबईला हरवून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. आपण सगळेच गडबडलेले, आनंदी आणि भावनिक आहोत. मी संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, कर्णधार आदित्य श्रीवास्तव आणि संपूर्ण संघाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. संपूर्ण विजेत्या क्रिकेट संघाचे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे भव्य स्वागत आणि नागरी सत्कार करण्यात येणार आहे. क्रिकेटचा नवा इतिहास रचणाऱ्या आमच्या क्रिकेट-वीर रणबाकुरांचे भव्य स्वागत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com