James Anderson  twitter aka X
क्रीडा

James Anderson Retirement: जेम्स अँडरसनला विजयी विदाई! इंग्लंडचा वेस्टइंडिजवर एकतर्फी विजय

Ankush Dhavre

वेस्टइंडिजचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि ११४ धावांनी विजय मिळवला आहे. हा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. दरम्यान इंग्लंडने शानदार विजय मिळवत जेम्स अँडरसनला विजयाने निरोप दिला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्याच दिवशी वेस्टइंडिजचा डाव अवघ्या १२१ धावांवर आटोपला. वेस्टइंडिजकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना लुईसने २७ धावा केल्या. तर हॉजने २३ धावा केल्या. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना एटकिंसनने सर्वाधिक ७ गडी बाद केले. या धावांच्या प्रत्तत्तरात इंग्लंडने शानदार कामगिरी करत ३७१ धावांचा डोंगर उभारला.

इंग्लंकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना झॅक क्रॉलीने ८९ चेंडूंचा सामना करत ७६ धावांची खेळी केली .तर जेमी स्मिथने ११९ चेंडूंचा सामना करत ७० धावा चोपल्या. यासह इंग्लंडने मोठी आघाडी घेतली. दरम्यान दुसऱ्या डावात वेस्टइंडिजचा डाव अवघ्या १३६ धावांवर आटोपला. या सामन्याचा अवघ्या अडीच दिवसात निकाल लागला आहे. दरम्यान हा सामना इंग्लंडने १ डाव आणि ११४ धावांनी आपल्या नावावर आटोपला आहे.

जेम्स अँडरसनचा शेवटचा सामना

हा कसोटी सामना जेम्स अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना आहे. आतापर्यंत त्याने १८८ कसोटी सामने खेळले आहे. यादरम्यान त्याने ७००हून अधिक गडी बाद केले आहेत. असा कारनामा करणारा तो जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT