Dunith Wellalage's Fathers Day x
Sports

Cricket : अष्टपैलू खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सामन्यादरम्यान झाले वडिलांचे निधन; VIDEO

Dunith Wellalage's Fathers Death : आशिया कप २०२५ मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका हा सामना खेळला गेला. सामना सुरु असताना श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दुनिथ वेल्लालागेच्या वडिलांचे निधन झाले.

Yash Shirke

  1. आशिया कप २०२५ सामन्यात खेळताना श्रीलंकेचा दुनिथ वेल्लालागेच्या वडिलांचे निधन झाले.

  2. कठीण प्रसंग असूनही दुनिथने सामना खेळला, मात्र त्याच्या खेळावर परिणाम दिसून आला.

  3. श्रीलंकेच्या संघाने अफगाणिस्तानवर ६ विकेट्सने विजय मिळवत सुपर फोरमध्ये प्रवेश केला.

Dunith Wellalage Asia Cup 2025 : अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका हा सामना काल (१८ सप्टेंबर) खेळला गेला. या सामन्यादरम्यान श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दुनिथ वेल्लालागेच्या वडिलांचे निधन झाले. सामना सुरु असतानाच निधनाची माहिती दुनिथला देण्यात आली. श्रीलंकेच्या माध्यमांच्या वृत्तांनुसार, दुनिथचे वडील सुरंगा वेल्लालागे यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यामधील दुनिथ वेल्लालागेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्रीलंका संघाचे संघ व्यवस्थापक आणि सहाय्यक कर्मचारी दुनिथला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळते. संघाचे प्रशिक्षक सनथ जयसूर्या हे त्याला दिलासा देत होते. या कठीण प्रसंगामध्येही दुनिथ सामन्यामध्ये सहभागी झाला.

वडिलांच्या निधनाच्या बातमीचा परिणाम दुनिथच्या खेळावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने चार ओव्हर्समध्ये तब्बल ४९ धावा दिल्या आणि फक्त एक गडी बाद केला. डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये दुनिथ गोलंदाजी करण्यासाठी आला होता. तेव्हा दुनिथच्या ओव्हरमध्ये स्ट्राईकवर असलेल्या मोहम्मद नबीने सलग पाच षटकार मारले.

श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने ६ विकेट्सने सामना जिंकला. अफगाणिस्तानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची निराशाजनक सुरुवात झाली. संघाने ७१ धावांमध्ये ५ विकेट्स गमावल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये रशीद खान आणि मोहम्मद नबी यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे अफगाणिस्तानने २० ओव्हर्स १६९ धावा केल्या.

१७० धावांचे लक्ष गाठताना श्रीलंकेने जोरदार कामगिरी केली. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने ५२ चेंडूत सर्वाधिक ७४ धावा केल्या, त्याने १० चौकार मारले. कुसल परेराने २८ धावा आणि कामिंदू मेंडिसने २४ धावांचे योगदान दिले. या विजयासह श्रीलंकेने सुपर फोरमध्ये स्थान निश्चित केले, तर अफगाणिस्तानचा संघ आशिया कपमधून बाहेर पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drinking water: तुम्हीही उभं राहून पाणी पिता? आजच बदल ही सवय; ४ आरोग्य समस्या उद्भवू शकतात

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन जाहीर सभा

Nagpur Politics: नागपूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, ३२ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, बॅगचे स्कॅन अन् स्टिकर लावूनच करता येणार प्रवास; नाहीतर...

Union Budget 2026: यंदा देशाचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? वाचा तारीख आणि वेळ

SCROLL FOR NEXT