duleep trophy  twitter
Sports

Duleep Trophy 2024: स्टार खेळाडूचा फ्लॉप शो सुरुच, टीम इंडियात संधी मिळणं कठीण

Shreyas Iyer: दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघात कमबॅक करु पाहणारा स्टार फलंदाज फ्लॉप ठरला आहे.

Ankush Dhavre

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ४ संघ मैदानात उतरले आहेत. भारतीय अ आणि ब संघाचा सामना बंगळुरुत सुरु आहे.

तर भारतीय सी आणि डी संघाचा सामना अंनतरपुरममध्ये सुरु आहे. ही स्पर्धा अतिशय महत्वाची असणार आहे. कारण या स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.

कसोटी संघात कमबॅक करण्यासाठी भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघातील अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरचाही समावेश आहे. अय्यर या स्पर्धेत भारतीय डी संघाचं नेतृत्व करतोय. दरम्यान पहिल्याच सामन्यात तो पूर्णपणे प्लॉप ठरला आहे.

श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी

दुखापतीमुळे संघाबाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतून भारतीय संघात कमबॅक केलं होतं. १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवायचं असेल, तर दुलीप ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. मात्र पहिल्या सामन्यात तो अवघ्या ९ धावा करत माघारी परतला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, या सामन्यात भारतीय सी संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पहिल्याच षटकात अथर्व तायडे ४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. असं वाटलं होतं की, श्रेयस अय्यर मोठी खेळी करेल. मात्र तो अवघ्या ९ धावा करत बाद झाला. भारतीय डी संघाचे ६८ धावांवर ६ फलंदाज तंबूत परतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

ठाकरे बंधू फक्त ५ तारखेपर्यंतच एकत्र? राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानं सांगितली पुढची रणनीती| VIDEO

SCROLL FOR NEXT