drs error in wpl 2024 chamari athapaththu controversial dismissial in up vs rcb match watch video twitter
Sports

WPL 2024, DRS Controversy: लेग साईडचा चेंडू अचानक इतका फिरलाच कसा; WPL मध्ये DRS मुळे पेटला नवा वाद -Video

DRS Controversy In WPL: या सामन्यात DRS वरुन वाद पेटल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

WPL 2024, DRS Controversy:

भारतात सध्या वुमन्स प्रीमियर लिग २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने युपी वॉरियर्स संघावर २३ धावांनी विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यात DRS वरुन वाद पेटल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अंपायरने दिलं नॉट आऊट मग.. .

या सामन्यात युपी वॉरियर्स संघातील फलंदाजाला वादग्रस्तरित्या बाद घोषित केलं गेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा DRS वरुन वाद पेटल्याचे पाहायला मिळाले आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

तर झाले असे की, युपी वॉरियर्स संघाची फलंदाजी सुरु होती. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून ८ वे षटक टाकण्यासाठी जॉर्जिया वेहरहेम गोलंदाजी करण्यासाठी आली होती. त्यावेळी अटापटू संघाची फलंदाज अट्टापटू ८ धावांवर फलंदाजी करत होती. जॉर्जिया वेहरहेमच्या षटकातील तिसरा चेंडू अट्टापटूच्या पॅडला जाऊन धडकला.

जॉर्जियाने जोरदार अपील केल. मात्र अंपायरने ही अपील फेटाळून लावली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची कर्णधार स्म्रिती मंधानाने DRS ची मागणी केली. हा चेंडू लेग साईडला पिच झाला होता त्यावेळी असं वाटलं होतं की, चेंडू आणि स्टम्पचा काहीच संपर्क होणार नाही.

मात्र हॉक आयमध्ये पाहिलं असता, चेंडू स्टम्प मिडल स्पम्पला लागत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. या निर्णयामुळे फलंदाज अट्टापटूसह कर्णधार एलिसा हेलीला देखील आश्चर्याचा धक्का बसला. या DRS चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT