Gas Shortage Impact: गॅसची तूट, रिक्षाचालकांकडून लूट; नाशिक, कोल्हापूरात 10 रुपयांची वाढ

Auto Fares Increased in Nashik, Kolhapur: युद्धाच्या झळा रिक्षा प्रवाशांच्या खिशालाही बसत आहेत. गॅसचा तुटवडा असल्याने रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट सुरु आहे. जादा पैसे मोजावे लागत असल्याने दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांचं आणि विद्यार्थ्यांचं बजेट कोलमडणार आहे. पाहूया एक रिपोर्ट.
Auto Fares Increased in Nashik, Kolhapur:
Kolhapur auto drivers increase fare by 10 rupeessaam tv
Published On

गॅसची टंचाई असल्याने एकीकडे गृहीणी बेजार झाल्यात. तर दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकांचही टेन्शन वाढलंय. अशी स्थिती असतानाच आता युद्धाच्या झळा सामान्य प्रवाशांच्या खिशालाही बसू लागल्या आहेत. नाशिकमध्ये रिक्षाचालकांनी पहिल्या टप्प्याच्या भाड्यात थेट 10 रुपयांची वाढ केलीय. इंधन दरवाढ आणि देखभाल खर्च परवडत नसल्यानं रिक्षाचालकांनी हा निर्णय घेतलाय. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांचं बजेट कोलमडणार आहे.

Auto Fares Increased in Nashik, Kolhapur:
देशभरातील पेट्रोल-डिझेल आणि LPGची टंचाई होणार दूर; केंद्र सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

नाशिक रोड पासून शहरातील महत्वाच्या ठिकाणी जाताना नवीन दर काय आहे पाहूया.

नाशिककरांचा रिक्षा प्रवास महागला

नाशिक रोडपासून बोधलेनगर, द्वारका, सारडा सर्कल, वडाळा नाका, सीबीएस, शालीमार येथील दर 30 रुपये होता तो आता 40 रुपये झाला आहे. तर नाशिक रोडपासून मेहेर सिग्नल, मुंबई नाका, मॅरेथॉन चौक, अशोकस्तंभ, रविवार कारंजा येथील दर 40 होता आता 50 रुपये झाला आहे.

Auto Fares Increased in Nashik, Kolhapur:
LPG Gas Cylinder Crisis: शहरात आणि ग्रामीण भागात किती दिवसांनी मिळेल गॅस सिलिंडर? सरकारनं दिली नवी अपडेट

दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अडवणूक सुरु आहे. गॅस टंचाई आणि दरवाढीच्या आडून अव्वाच्या सव्वा भाडे अकारले जात आहेत. आरटीओने याकडे लक्ष द्यावे, अशीही मागणी होत आहे. आधीच महागाईचे चटके बसत असताना दररोजचा रिक्षा प्रवासही महागल्याने प्रवासी हवालदील झालेत. युद्ध थांबून परिस्थिती कधी पूर्ववत होणार ? याकडे सामान्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com