Ravi Shastri on Virat Kohli ODI Future saam tv
Sports

Ravi Shastri: ROKO शी पंगा घेऊ नका नाहीतर...! रवी शास्त्रींनी कोणाला सुनावले खडे बोल?

Ravi Shastri on Virat Kohli ODI Future: भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री नेहमीच आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत ROKO सोबत मस्ती करू नका असं म्हटलंय

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियातील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या केवळ वनडे फॉर्मेटमध्येच खेळतायत. या दोन्ही खेळाडूंनी २०२७ पर्यंतच्या वर्ल्डकप पर्यंत खेळावं अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. दरम्यान टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोहली आणि रोहित यांच्या टीममधील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना थेट टोला लगावला आहे. शास्त्रींचं म्हणणं आहे की, विराट आणि रोहितसारख्या दर्जेदार खेळाडूंशी पंगा घेणं योग्य नाही.

काय म्हणाले रवी शास्त्री?

प्रभात खबरनुसार, रवी शास्त्री म्हणाले, "विराट कोहली आणि रोहित शर्मा हे वनडे क्रिकेटचे दिग्गज खेळाडू आहेत. तुम्ही अशा खेळाडूंशी पंगा घेऊ नये."

प्रश्न का उपस्थित होत आहेत?

रवी शास्त्री यांना ज्यावेळी विचारलं की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्यासंदर्भात प्रश्न का उपस्थित होतायत तेव्हा ते म्हणाले की, "काही लोक असं करतायत. मी एवढेच सांगू इच्छितो की, जर हे दोघे टिकून राहिले आणि सर्व गोष्टी योग्य पद्धतीने करत राहिल्या तर जे कोणी त्यांच्याशी पंगा घेतायत ते लवकरच गायब होतील."

रवी शास्त्रींनी पुढे सांगितलं की, "अशा खेळाडूंशी मस्ती करू नका, पण काही जणं करणारे करतायत. जर त्यांचा डोकं ठीर झालं आणि योग्य बटण दाबलं तर बाकीचे सगळे निघून जातील."

काही रिपोर्ट्सनुसार, मॅनेजमेंटला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतीय फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही खेळावं असं वाटतंय. दरम्यान विराटने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी होकार दिला आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सिरीजमधील दोन्ही सामन्यांत शतक झळकावलंय. पहिल्या सामन्यात त्याने 135 रन्स केले. तर दुसऱ्या सामन्यात 102 रन्सची खेळी केली. दुसरीकडे, रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये अर्धशतक केलं आणि त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये शतक ठोकलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिरूरमध्ये शेतशिवारात बिबट मृत अवस्थेत आढळला

Chanakya Niti: विश्वासूच तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात; कसं ओळखायचं? चाणक्यांनी दिला सल्ला

कल्याणमध्ये जलवाहिनी फुटली, अनेक भागातील पाणी पुरवठा बंद, रस्ते अन् शाळाही बंद

Rava Cake: ख्रिसमससाठी बनवा मऊ रवा केक, तोंडात टाकताच विरघळेल

Pune : पुणेकरांना दिलासा! चाकण, शिरूर, रावेत, नऱ्हे, हडपसर मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, उन्नत मार्ग अन्... ; काय आहे नेमका प्लान?

SCROLL FOR NEXT