डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मोठी देसाई गावचा सुपुत्र प्रेम देवकरची भारतीय अंडर १९ संघात निवड झाली आहे. येत्या ८ डिसेंबरपासून अंडर १९ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात प्रेम देवकरलाही स्थान देण्यात आलं आहे. (Prem Devkar News)
प्रेमची भारतीय अंडर १९ संघात निवड होताच गावकऱ्यांचा आणि मित्र मंडळींचा एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. प्रेम देवकरची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सर्व सामान्य कुटुंबातील प्रेम देशाचं नेतृत्व करणार असल्याने शेकडो लोकं त्याचं कौतुक करण्यासाठी आली होती. प्रेम देवकर हे नाव टेनिस क्रिकेटमध्ये प्रचंड गाजतंय. त्याने टेनिस क्रिकेट स्पर्धेतील एका स्पर्धेत हॅट्रीक देखील घेतली होती.
सर्वांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याने भविष्यात भारतीय संघासाठी आणि आयपीएल स्पर्धेत खेळावं अशी इच्छा प्रेम देवकरच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. अंडर १९ आशिया कप स्पर्धेचा थरार यूएईत रंगणार आहे. या स्पर्धेत पंजाबचा उदय सहारन भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. प्रेमसह महाराष्ट्रातील अर्शिन कुलकर्णी आणि सचिन धस यांनाही भारतीय संघात स्थान मिळालं आहे. (Latest sports updates)
असा आहे १९ वर्षाखालील भारतीय संघ..
अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.
स्टँडबाय खेळाडू: प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन.
राखीव खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.