Team India News Updates
Team India News Updates Saam Tv
क्रीडा | IPL

WTC Final 2023: ४ सामन्यांमध्ये घेतल्या ४७ विकेट्स तरीही स्थान धोक्यात ! वर्ल्ड कप फायनलला रोहित कोणाला संधी देणार?

Ankush Dhavre

INDIAN TEAM FOR WTC FINAL: न्यूझीलंड विरुध्द श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंका संघ पराभूत होताच, भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. स्पर्धेतील पहिल्या हंगामात भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर आता सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाला जेतेपद मिळवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुध्द होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ मजबूत प्लेइंग ११ सह उतरण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

या सामन्यासाठी खेळवण्यात येणाऱ्या प्लेइंग ११ बाबत बोलताना दिनेश कार्तिकने मोठे वक्तव्य केले आहे. दिनेश कार्तिकचे म्हणजे आहे की, भारतीय संघात अक्षर पटेलला संधी मिळणं कठीण आहे.

आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या जोडीने ४७ गडी बाद केले होते. ज्यात अश्विनने २७ आणि जडेजाने २२ गडी बाद केले होते.

दिनेश कार्तिकने म्हटले की, "जर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा फिट राहिले तर रवींद्र जडेजाला संधी मिळणं कठीण आहे. मला वाटतं की, शार्दुल ठाकूरला संधी मिळेल. कारण आपण पाहिलं आहे की, तो फलंदाजीही करू शकतो." अक्षर पटेलने देखील फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. नुकताच ऑस्ट्रेलियाविरुध्द झालेल्या कसोटी मालिकेत त्याने २६४ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)

अश्विन, जडेजाही होऊ शकतात बाहेर?

तसेच आर अश्विन आणि रवींद्र जडेजाबाबत बोलताना त्याने म्हटले की, "असं ही होऊ शकतं की, भारतीय संघात आर अश्विन किंवा जडेजा पैकी एकालाच संधी दिली जाऊ शकते. गेल्यावेळी भारतीय संघाने हीच चूक केली होती. त्यावेळी दोघांनाही खूप कमी गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती."

तसेच तो पुढे म्हणाला की, "हा केवळ एक सामना नसणार आहे. या सामन्यानंतर एक नवे चक्र सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला विचार करावा लागेल की, तुमचे सर्वोत्तम ११ खेळाडू कोण आहेत."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Helicopter Crash Video: हवेत गिरट्या घातल्या; हेलकावे खाल्ले अन् क्षणात कोसळलं.. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश; थरारक VIDEO

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: राज्यातील १३ जागांवर ठाकरे गटविरुद्ध शिवसेना,तर १५ जागेवर काँग्रेसची भाजपशी लढत

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

Amitabh Bachchan: कोस्टल रोड, अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट; भाजप अन् आदित्य ठाकरेंमध्ये रंगलं ट्विट वॉर

SCROLL FOR NEXT