Ind vs Aus 1st ODI: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना रद्द होणार? हे असू शकते कारण

Ind vs Aus 1st ODI :पहिल्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे
team india
team indiafile photo

Ind vs Aus 1st odi Weather report: बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत २- १ ने मालिका जिंकली होती. आता १७ मार्चपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे.

दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. दरम्यान पहिल्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. (Latest sports updates)

team india
Ind vs Aus: टेस्ट तर जिंकले मात्र वनडे मालिका जिंकणं कठीण! ऑस्ट्रेलियाचा 'हा' दमदार रेकॉर्ड एकदा पाहाच..

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. हा वनडे सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कारण हवामान खात्याने १५ ते १७ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत देखील उद्या ढगाळ वातावरण असणार आहे.

आज मुंबईतील काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तसेच उद्यादेखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

कसोटी मालिकेत भारतीय संघाचा विजय..

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामान्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत २-१ ने मालिकेत विजय मिळवला.

मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली होती. तर इंदूर कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कमबॅक केले होते.

तर अहमदाबादच्या मैदानावर पार पडलेला सामना अनिर्णित राहिला होता.

team india
IND vs AUS ODI Series : टीम इंडियाला वनडे मालिकेआधी मोठा हादरा; हुकमी एक्का संघाबाहेर, नेमके कारण काय ?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका वेळापत्रक

पहिला सामना- १७ मार्च - शुक्रवार, मुंबई

दुसरा सामना - १९ मार्च- रविवार- विशाखापट्टणम

तिसरा सामना - २२ मार्च, बुधवार, चेन्नई

ऑस्ट्रेलिया संघ -

स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन एबॉट, एश्टन एगर, अॅलेक्स केरी, नॅथन एलिस, कॅमरन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा

भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com