Ind vs Aus: टेस्ट तर जिंकले मात्र वनडे मालिका जिंकणं कठीण! ऑस्ट्रेलियाचा 'हा' दमदार रेकॉर्ड एकदा पाहाच..

Ind vs Aus 1st odi: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना १७ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
India vs Australia ODI Series
India vs Australia ODI SeriesFile Photo

Ind vs Aus 1st odi: काही दिवसांपूर्वीच भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली.

या मालिकेत दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली होती. भारतीय संघाने २-१ ने ही मालिका खिशात घातली. आता १७ मार्चपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे.

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना १७ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

याच वर्षी भारतात वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. ही स्पर्धा पाहता दोन्ही संघ या मालिकेत जोर लावताना दिसून येऊ शकतात.

कसोटी मालिका जिंकून आलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ या मालिकेत जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. (Latest sports updates)

India vs Australia ODI Series
Ind vs Aus: फिटनेसमुळे नव्हे तर 'या' कारणामुळे रोहित शर्मा पहिल्या वनडेसाठी उपलब्ध नसेल; समोर आलं मोठं कारण

मात्र हे काम सोपं नसणार आहे. कारण कसोटी मालिका गमावलेल्या ऑस्ट्रेलियाचा भारतात वनडेमध्ये दमदार रेकॉर्ड आहे. त्यामुळे भारतीय संघाला सावध राहावं लागणार आहे. हे दोन्ही संघ जेव्हा २०१९ मध्ये आमने सामने आले होते, त्यावेळी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

अशी राहिली आहे दोन्ही संघांची कामगिरी..

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ १४३ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान ५३ वेळेस भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर ८० वेळेस भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर १० सामने अनिर्णीत राहिले आहेत.

India vs Australia ODI Series
IND vs AUS ODI Series : टीम इंडियाला वनडे मालिकेआधी मोठा हादरा; हुकमी एक्का संघाबाहेर, नेमके कारण काय ?

भारतात वनडे खेळताना दोन्ही संघांची कामगिरी..

भारतात वनडे सामने खेळताना दोन्ही संघ ६४ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने २९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ३० सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर ५ सामने अनिर्णीत राहिले आहेत.

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ २०१८-१९ मध्ये देखील आमने सामने आले होते. या मालिकेत भारतीय संघाला ३-२ ने पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारतीय संघाने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. मात्र अंतिम ३ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले आणि ही मालिका आपल्या खिशात घातली होती. या मालिकेत उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ३८३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ शतके झळकावली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com