Wai Fort : कातळात कोरलेल्या पायऱ्या अन् भव्य डोंगररांग; वाईजवळ लपलाय खतरनाक किल्ला, चढाई पाहूनच उडेल धडकी

Shreya Maskar

वाई

केंजळगड किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील घेरा केंजळ गावात आणि सातारा जिल्ह्यातील वाईजवळ वसलेला आहे. हा महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे.

Wai | google

केंजळगड किल्ला

केंजळगड किल्ला हा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे, उंच कातळकड्यांमुळे वेगळा ठरतो. हा किल्ला इतिहासप्रेमी, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षक ठिकाण आहे.

Kenjalgad Fort | google

किल्ल्याची उंची

केंजळगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण ४,२६९ ते ४,२७० फूट आहे. किल्ल्याचे पठार लांबट आणि तुलनेने अरुंद आहे.

Altitude of the Fort | google

किल्ल्याचा आकार

किल्ल्याच्या कडेला सुमारे ३० ते ४० फूट उंचीची नैसर्गिक कातळभिंत असल्यामुळे दूरून डोंगराच्या माथ्यावर दगडी टोपी ठेवल्यासारखा आकार दिसतो. किल्ल्याच्या मुख्य लांबीचा उल्लेख सुमारे ३८८ मीटर आणि रुंदीचा सुमारे १७५ मीटर असा आढळतो.

Shape of the Fort | google

किल्ला कोणी बांधला?

केंजळगड किल्ला 12 व्या शतकात शिलाहार वंशाचा / पन्हाळा राजा भोज II याने बांधला होता.

Who Built the Fort? | google

कसं जाल?

मुंबईहून पुणे किंवा साताऱ्यापर्यंत रेल्वेने प्रवास करा. त्यानंतर स्टेशनला उतरून तुम्ही पुढे रिक्षाने किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत पोहचा. पुढे ट्रेकिंग करा.

How to Reach? | google

वाईजवळील पर्यटन स्थळे

वाईला गेल्यावर धोमधरण , राजपुरी लेणी, मेनावली घाट, पांडवगड किल्ला यांना भेट द्या.

Tourist Attractions | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : लोखंडी शिड्यांचा थरार अन् खडकाळ वाट, मुंबईपासून काही अंतरावर वसलाय 'हा ' खतरनाक किल्ला

Karjat Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...