Karjat Fort : लोखंडी शिड्यांचा थरार अन् खडकाळ वाट, मुंबईपासून काही अंतरावर वसलाय 'हा ' खतरनाक किल्ला

Shreya Maskar

रायगड

सोंडाई किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळ सोंडेवाडी आणि वावरले गावात आहे. येथे थरारक ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.

Raigad | google

सोंडाई किल्ला

सोंडाई किल्ल्याच्या चढाईदरम्यान काही ठिकाणी लोखंडी शिड्यांचा आधार घ्यावा लागतो. माथ्यावरून मोरबे धरणाचा परिसर आणि आजूबाजूच्या डोंगरांचे सुंदर दृश्य दिसते.

Sondai Fort | google

किल्ला कोणी बांधला?

सोंडाई किल्ला हा डोंगरमाथा १७व्या शतकाच्या आसपास टेहळणीसाठी वापरला जात असावा. हा किल्ला छोटा टेहळणी बुरूज किंवा चौकी म्हणून ओळखला जातो.

Who built the fort? | google

किल्ल्याची उंची

सोंडाई किल्ला समुद्रसपाटीपासून अंदाजे १,२०० फूट म्हणजे सुमारे ३६६ मीटर अंतरावर आहे. खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या, पायऱ्या आणि देवीचे मंदिर यांचे अवशेष येथे पाहायला मिळतात.

Height of the fort | google

किल्ल्याच्या नावाचा इतिहास

किल्ल्याच्या माथ्यावर सोंडाई देवीचे मंदिर आहे. याच देवीच्या नावावरून किल्ल्याला सोंडाई नाव पडल्याचे मानले जाते.

History of the name of the fort | google

आजूबाजूचा परिसर

किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारा जलाशय, हिरवे डोंगर आणि दूरवर पसरलेला परिसर फोटोशूटसाठी बेस्ट आहे. मित्रांसोबत वीकेंडला येथे नक्की जा.

Surroundings | google

कसं जाल?

मुंबईहून कर्जतला जाणारी ट्रेन पकडा. कर्जत स्थानकावरून सोंडेवाडी गावापर्यंत स्थानिक रिक्षा किंवा टॅक्सीने जाता येते. पुढे पायी ट्रेक सुरू होतो.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Nagpur Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...