Shreya Maskar
भंडारा येथे पवनी किल्ला किंवा पवन राजा किल्ला वसलेला आहे. हे ऐतिहासिक ठिकाण नागपूरजवळ आहे. पवनी किल्ला विदर्भाची शान आहे.
पवनी किल्ला ऐतिहासिक तटबंदी, खंदक, जुने प्रवेशद्वार यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच मध्ययुगीन किल्लेबांधणीचे काही भाग १७व्या–१८व्या शतकांशी संबंधित आहेत.
भंडारा जिल्ह्यातील पवनीला 'विदर्भाची काशी' म्हणून ओळखले जाते. येथे शेकडो प्राचीन मंदिरे आहेत.
पवनी किल्ल्याच्या तीन बाजूला टेकड्या आणि एका बाजूला वैनगंगा नदी वाहते.मौर्य काळ, सातवाहन काळ, गोंड राजे आणि नागपूरकर भोसले यांच्या इतिहासाची साक्ष हा किल्ला देतो.
मातीच्या उंच बांधावर दगडी भिंती बांधण्यात आल्या होत्या. किल्ल्याच्या तीन बाजूंना खंदक, तर चौथ्या बाजूला वैनगंगा नदी नैसर्गिक संरक्षण देत होती.
तटबंदीच्या काही भागांमध्ये बुरुजांचे अवशेष आढळतात.जुन्या मुख्य प्रवेशद्वाराचे अवशेष आजही ऐतिहासिक महत्त्व दर्शवतात.
मुंबईहून नागपूरपर्यंत रेल्वेने प्रवास करा. नागपूरहून भंडारा आणि पुढे पवनीकडे जाण्यासाठी बस किंवा टॅक्सीचा पर्याय निवडा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.